Leopard In Goa: भुईपाल परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वासरे, कुत्र्यांचा फडशा

वन खात्याने पिंजरा लावावा: पंच सदस्य स्मिता मोटे यांची मागणी
Goa News | Leopard
Goa News | LeopardDainik Gomantak
Published on
Updated on

Leopard In Goa होंडा पंचायत क्षेत्रातील भुईपाल प्रभाग ९ मध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांची गुरे वासरे, कुत्र्यांचा फडशा पाडला जात असल्याच्या तक्रारी वाढलेल्या असून वन खात्याने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन बिबट्याचा जेरबंद करून बंदोबस्त करावा,अशी मागणी स्थानिक पंचायत सदस्य स्मिता मोटे यांनी केली आहे.

बुधवार,१६ रोजी रात्री भुईपाल चेकपोस्ट भागातील धाकटू दवणे या शेतकऱ्याच्या गोठ्यात प्रवेश करून सदर बिबट्याने एक वासरू ठार मारले, तर अन्य एका वासराला जखमी केले आहे.

या घटनेची माहिती दवणे यांनी भुईपाल येथील वन रक्षकाला दिल्यानंतर होंडा येथील पशुचकित्सा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

दरम्यान, अशा प्रकारे बिबट्याने भुईपाल प्रभाग ९ मध्ये धुमाकूळ घातल्याने या परिसरात दहशत आहे. वाळपई वनअधिकारी शामसुंदर गावस यांना सदर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्मिता मोटे यांनी केली आहे.

Goa News | Leopard
Cricket Betting Racket: न्यूझीलंड विरुद्ध यूएई क्रिकेट सामन्यावर गोव्यात बेटींग; 12 जणांना अटक

दोन महिन्यांपासून दहशत

गेल्या दोन महिन्यांपासून भुईपाल चेकपोस्ट, डोबवाडा, भेडशेवाडा परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे, यामध्ये भेडशेवाडा येथील महानंद कोलाप्टे यांच्या मालकीचे चार कुत्रे बिबट्याने उचलून नेले होते.

तसेच चेकपोस्ट परिसरात सुनील बाजारी यांच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. या प्रमाणे डोबवाडा येथील काही जणांच्या कुत्र्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Goa News | Leopard
Banastarim Bridge Accident: माजी सहकारी ठरला मृत्यूसाठी कारणीभूत

आमदार राणेंकडून दखल

दरम्यान, या प्रकरणाची दखल पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी घेऊन त्याठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्याचे आदेश वाळपई वन विभागाला देताच त्याच्याने वाळपई वन विभागाचे अधिकारी महादेव गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

या विषयी आमदार डॉ.दिव्या राणे यांनी तातडीने दखल घेतली असल्याने पंच स्मिता मोटे यांनी त्यांचे व व खात्याचे आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com