छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सां जुझे द आरियल येथे 18 व 19 फेब्रुवारी रोजी तणाव झाला व शेवटी स्थानिकांवर पोलिस स्थानकावर गुन्ह्यांची नोंद झाली.
या संदर्भात आज स्थानिक ग्रामस्थ सां जुझे द आरियल पंचायती बाहेर एकवटले व त्यांनी प्रश्र्न उपस्थित केल की स्थानिकांवरच गुन्ह्याची नोंद का, तणाव तर बाहेरुन लोक आले होते त्यांनी केला होता.
आम्ही तर इथलेच आहोत. आम्ही जाणार कुठे, असा प्रश्न स्थानिकांचे प्रतिनिधी पिटर व्हिएगश यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
उद्या सोमवारी ते सरपंच लिंडा फर्नांडिस यांना निवेदन सादर करणार असून या घटनेची सविस्तर चौकशी व तपास 15 दिवसांच्या आत करून अहवाल तयार करण्याची मागणी या निवेदनात केल्याचे व्हिएगश यांनी सांगितले. निवेदनाची प्रत उद्या सरपंचाला देण्यासाठी ती पंचाकडे आज सुपुर्द करण्यात आली.
तणावाला मंत्रीच जबाबदार !
18 व 19 रोजी ज्या घटना झाल्या त्याची सविस्तर माहिती निवेदनात दिली असून तणाव निर्माण करण्यास समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई व त्यांचे समर्थक जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
शिवाय त्यावेळी जे पोलिस अधिकारी व जिल्हाधिकारी उपस्थित होते त्यानी सुद्धा हे प्रकरण शांतपणाने सोडवायला हवे होते. मंत्र्याने सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचे व्हिएगश म्हणाले.
आज स्थानिकांनी या संदर्भात चर्चा करण्यास खास ग्रामसभेची मागणी केली होती. त्या संदर्भातील परवानगी सरपंचाने बीडीओकडे मागितली होती.
मात्र पुढील रविवार म्हणजे 3 मार्च रोजी सर्वसाधारण ग्रामसभा होणारच आहे, तेव्हा खास ग्रामसभेची आवश्यकता नसल्याने बीडीओने सरपंचाला कळविले आहे.
-पीटर व्हिएगश, रहिवाशी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.