Bhoma Road Issue: चौपदरी महामार्गाचा आराखडा रद्द करा! भोम-अडकोण ग्रामसभेत मागणी

Bhoma Road Issue: लोकांना अंधारात ठेवून केले सादरीकरण
Bhoma Road Issue
Bhoma Road IssueDainik Gomantak

Bhoma Road Issue: भोम-अडकोण गावातून जाणारा चौपदरी महामार्ग आराखडा चुकीचा असून हा आराखडा रद्द करून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन नवीन आराखडा तयार करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव आजच्या ग्रामसभेत घेण्यात आला.

पंचायतीसमोर उभारलेल्या मंडपात ही ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच दामोदर नाईक यांनी स्वागत, तर सचिव विराज नाईक यांनी गेल्या ग्रामसभेचा अहवाल सादर केला.

सरकारने विश्वासात न घेता घिसाडघाईने आराखडा तयार केल्याचे मत ग्रामस्थांनी मांडले. या रस्त्याबाबतचे सादरीकरणही व्यवस्थित झाले नसून ग्रामस्थांना अंधारात ठेवून व गावच्या हिताला मारक ठरणारा हा आराखडा त्वरित रद्द करावा.

त्यासाठी राज्य सरकार, सार्वजनिक बांधकाम खाते, मुख्यमंत्री तसेच केंद्रीय रस्ते व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पंचायतीने पत्रव्यवहार करावा, असा एकमुखी ठराव संमत झाला.

Bhoma Road Issue
Goa Drugs Case: हडफडे येथे अमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; नायजेरियन नागरिकाकडून 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

बाणस्तारी मार्केट संकुलाचाही प्रश्न उपस्थित
बाणस्तारी येथील मार्केट संकुलाचा प्रश्न ग्रामसभेत उपस्थित झाला. सरपंच दामोदर नाईक यांनी मार्केट संकुलात स्थानिकांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट केले.

मात्र, संकुलातील अतिरिक्त बांधकामामुळे सरकारच्या दक्षता खात्याकडे तक्रार गेल्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पंचायत मंडळाने सांगितले. सोपो पावत्यांवरही ग्रामसभेत चर्चा झाली.

किनारी भागात पार्किंग केल्यास कारवाई : मोरजी पंचायतीचा निर्णय:-
मुख्य रस्त्यावर तसेच किनारी भागातल्या ‘नो पार्किंग’मध्ये गाड्या पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मोरजी पंचायतीच्या ग्रामसभेतत ठरविण्यात आले.

रस्त्याशेजारी लावलेले हॉटेलचे बोर्ड काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जिल्हा पंचायत निधीतून होणाऱ्या विकासकामांवरही ग्रामसभेत चर्चा झाली.

पोंबुर्फा-ओळावली ग्रामसभा स्थगित:-
पोंबुर्फा-ओळावली ग्रामसभेत गोंधळ उडाला. प्रश्न विचारणाऱ्या ग्रामस्थाला एका पंच सदस्याकडून मारहाणीचा प्रयत्न झाला. त्यामुळे सरपंचांकडून ही ग्रामसभा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुळगावात पुन्हा खाणीचा मुद्दा:-
मुळगाव पंचायतीच्या ग्रामसभेत आज पुन्हा एकदा खाणीचा मुद्दा चर्चेत आला. गावचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत खाणीला विरोध कायम राहणार, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. खाणीमुळे शेतीचे नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावाबाहेरील मद्यपींचा विषयही चर्चेत आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com