Rumdamol Dispute Dainik Gomantak
गोवा

Rumdamol Dispute: शुभेच्छा फलकावरुन रुमडामळ येथे पुन्हा तणाव, पोलिसांचा हस्तक्षेप

शुभेच्छा बॅनरवरील फोटोला आक्षेप घेतल्याने वाद

गोमन्तक डिजिटल टीम

Rumdamol Dispute एका महिन्यापूर्वी पंचांवर झालेल्या हल्ल्यामुळे वादात सापडलेल्या रुमडामळ-हाऊसिंग बोर्ड परिसरातील दोन समाजांमधील तणाव अद्याप निवळलेला नाही.

त्यातच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या फलकावर सरहद्द गांधी अब्दुल गफार खान यांचे छायाचित्र लावल्याने तिथे पुन्हा वाद निर्माण झाला आहे.

बुधवारी पोलिसांनी हा बॅनर काढण्यास संबंधितांना सांगितले होते. पण मध्यरात्री एक वाजता तेथे जमाव जमला. त्यावेळी पोलिसांनी जमावातील लोकांना जाण्यास सांगितले. तरीही तिथेच थांबलेल्या दोघा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या बॅनरवर सरहद्द गांधींचा फोटो लावल्यास तो गुन्हा कसा, असा सवाल येथील पंच सदस्य उमर पठाण यांनी केला आहे. पोलिस विनाकारण आमच्या युवकांना सतावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रुमडामळ हाऊसिंग बोर्ड परिसरात एक बॅनर लावण्यात आला होता.

या बॅनरवर महात्मा गांधी, पंडित नेहरु, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यांच्यासह अब्दुल गफार खान व अशफाक उल्लाह खान यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.

मात्र काहीजणांकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर पाकिस्तानी कार्यकर्त्यांचे फोटो असल्याचे सांगत आक्षेप घेण्यात आला. हे बॅनर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या प्रतिबंधित संघटनेकडून लावण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

मायणा-कुडतरी पोलिसांनी बुधवारी या प्रकरणाची दखल घेतली होती. बॅनर खाली न काढल्यास कारवाई करण्याचा इशारा दिल्यावर हा बॅनर काढण्यात आला. बुधवारी रात्री गर्दी झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दोघा युवकांना पोलीस ठाण्यात आणले. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले.

रुमडामळ पंचायतीकडून विनापरवाना लावलेल्या बॅनरवर कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आलेला असून त्यानुसार बेकायदेशीर सर्व बॅनर काढण्यास सांगितले आहे. बुधवारी रात्री रुमडामळ परिसरात जमाव एकत्र झाला होता. पोलिसांनी सर्वांना जाण्यास सांगितले.

मात्र दोघे युवक त्याचठिकाणी थांबले व हुज्जत घालू लागले यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता त्यांना सोडण्यात येईल. परिसरातील शांतता राहावी यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याची गरज आहे, असे पोलीस निरीक्षक अरुण देसाई यांनी सांगितले.

काहीजण रुमडामळ-हाऊसिंग बोर्ड परिसराचा समाजमाध्यमांवर उल्लेख ‘सुल्तानपूर, इस्लाम चौक’ असा करत आहेत. शांतताभंग करणारी अशाप्रकारची कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी रुमडामळ पंचायतीचे पंच विनायक वळवईकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT