Goa News| Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte Statement: अनेक सेवा उपलब्ध करून यंदाचा पर्यटन हंगाम आशादायी करु

Rohan Khaunte Statement: मडगावात एका हॉटेलचे उद्‌घाटन केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

दैनिक गोमन्तक

Rohan Khaunte Statement: आगामी पर्यटन मोसम गोव्यासाठी चांगलाच राहील, अशी अपेक्षा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली. देशभरातील व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार साधनसुविधांमध्ये वाढ करीत आहे. पर्यटकांसाठीच्या अनेक सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.

मडगावात एका हॉटेलचे उद्‌घाटन केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. यंदा इतर राज्यांतील पर्यटकांबरोबरच इतर देशांतील पर्यटकही गोव्याला भेट देणार आहेत. जवळजवळ 60 क्रुझ बोटी येणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

पर्यटनाच्या दृष्टीने पुढील सहा महिने महत्त्वाचे आहेत. सहा महिन्यांनंतर आणखी पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहेत, असे खंवटे म्‍हणाले.

गोव्यात पर्यटकांना जेवणखाण्याचा प्रश्र्न उद्‌भवत नाही. गोव्यामध्ये सर्व राज्यांतील, सर्व देशांतील जेवणखाण उपलब्ध असल्याने पर्यटकांना इथे यायला कोणतीही आडकाठी राहत नाही, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

या हॉटेल उद्‌घाटनप्रसंगी आमदार उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, चंद्रकांत कवळेकर, माजी आमदार क्लाफासियो डायस, विल्फ्रेड डिसा, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ व इतर नगरसेवकही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT