Illegal Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Liquor Seized: मडगावातून अमली पदार्थांची तस्करी सुरुच; आठवडाभरात तिसरी घटना; दारुच्या 38 बाटल्या जप्त

Goa Illegal Liquor Seized: शनिवारी मध्यरात्री मडगाव येथे एका परप्रांतीयांकडून पोलिसांनी 4 लाखांचा अमली पदार्थ- गांजा जप्त केल्याची घटना घडली होती.

Ganeshprasad Gogate

Goa Illegal Liquor Seized: गोव्यातून परराज्यात गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर तस्करी होत असून या संबंधीच्या बातम्या अनेकवेळा समोर येत असतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या गोव्याशेजारच्या राज्यात प्रामुख्याने दारू विक्री केली जाते.

मात्र गोवा पोलीस आणि चेकपोस्ट तपासणी अधिकारी यांच्या सतर्कतेने अशा घटनांना आळा बसत असल्याचेही दिसून आलंय.

मडगाव रेल्वे स्थानकावरून कर्नाटकला बेकायदेशीररित्या मद्यसाठा नेणार्‍या संशयित अशोक याला रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडे 6,560 रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या मद्याच्या 38 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील रहिवासी संशयित अशोक हा सोमवारी सकाळी 10 वाजता मडगाव रेल्वेस्थानकावर आला असता त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.

तसेच त्याच्याकडे मद्याच्या वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले.

रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक विनोदकुमार मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

दरम्यान शनिवारी मध्यरात्री मडगाव येथे एका परप्रांतीयांकडून पोलिसांनी 4 लाखांचा अमली पदार्थ- गांजा जप्त केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी मडगाव येथे क्राईम ब्रँचने मध्यरात्री कारवाई करत जीतेंद्र नायक (वय 28 वर्षे, ओडिसा) याला केली अटक केली होती.

तर 1 मार्च रोजी रात्री मडगाव रेल्‍वे स्‍थानकाजवळ आके भागात केलेल्‍या कारवाईत आनंद हरिश्र्‍चंद्र साळगावकर (41) याला अटक करुन त्‍याच्‍याकडून 2.71 लाखांचे अंमली पदार्थ पकडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT