Goa Railway
Goa Railway Dainik Gomantak
गोवा

Goa Railway: ऐन दिवाळीत आरक्षित तिकिटांवर दलालांचा डल्ला!

दैनिक गोमन्तक

Goa Railway: मडगाव येथे रेल्वे तिकीट विक्री करीत असलेले एजंट आरक्षणात प्रवाशांकडून तिकीट दरापेक्षा दुप्पट दर आकारून प्रवाशांची लूट करीत आहेत. नाईलाजाने प्रवासीही एजंट सांगेल तो दर देत आहेत. अशाने रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्या दलालांची चांदी होत आहे.

दरम्यान, या दलालांवर रेल्वे प्रशासन कारवाई का करीत नाही, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. सध्या दिवाळीची सुट्टी सुरू झाल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटांत आरक्षण मिळणे कठीण होत आहे.

तसेच, यावेळी काही प्रवासी रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्या एजंटकडे धाव घेतात. प्रवास गरजेचा असल्याने नाईलाजाने एजंट सांगेल त्या किमतीत आरक्षित तिकीट खरेदी केले जाते. यामुळेच सध्या दलालांची चांदी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थेट रेल्वे स्थानकाच्या तिकीट विक्री काउंटरवर जाऊन काही एजंटची नेमलेली माणसे प्रवाशांची तिकिटे खरेदी करतात. त्यांचा संशय येऊ नये म्हणून दररोज माणसे बदलण्यात येतात. प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळाले नाही तर तत्काळ आरक्षण तिकीट काढण्याची सोय आहे.

मात्र, तिथेही या दलालांनी आपली माणसे नेमल्याने ही तिकिटेही त्यांच्याच घशात जात आहेत. जलदपासून ते आरक्षित तिकिटामागे 400 ते 1000 रुपयांची हेराफेरी या दलालांकडून होते. या प्रकाराबद्दल प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

'नो रुम'चेही तिकीटही उपलब्ध!

प्रवाशांनी एखाद्या गाडीची स्थिती पाहिल्यास ‘नो रूम’ येते. याच गाडीचे तिकीट दलालांच्या माध्यमातून काढल्यास त्वरित मिळते. दलाल कोणत्याही कोट्याचा वापर करून तिकिटाच्या रकमेपेक्षा जास्त वसुली करतात. यात तिकीट विक्री करणारे रेल्वेचे कर्मचारी व एजंट यांचे साटेलोटे तर नाही ना, असा संशय येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

Vasco News : चिखलीत बिल्डरने अवैधपणे बनवली पार्किंगसाठी जागा

Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

Tihar Jail: तिहार जेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

Supreme Court: ‘PM मोदींवर 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घाला’, सर्वोच्च न्यायालयात याचिका; वाचा नेमंक प्रकरण?

SCROLL FOR NEXT