Road Safety in Goa : गोवा वाहतुकीच्या दृष्टीने किती सुरक्षित?

जागतिक कायद्याप्रमाणे पादचाऱ्याला रस्त्यावरच्या पदपथावर पहिला हक्क असतो. पादचाऱ्याने पदपथावर एकदा पाय ठेवला की सगळी रहदारी ताबडतोब जागच्याजागी थांबली पाहिजे. त्याला रहदारी अनुशासन म्हणतात.
Goa Traffic Jam
Goa Traffic JamSandip Desai

Road Safety in Goa : गोवा हे एक अतिशय छोटेखानी राज्य आहे. एकूण लोकसंख्या अवघी पंधरा लाख. पण इथे 11.63 लाख वाहने नोंदणीकृत आहेत. तसेच गोवा पर्यटकांसाठी प्रचंड आकर्षणाचे केंद्र असल्या कारणाने वर्षाकाठी पन्नास लाखांच्यावर पर्यटक हजर असतात. त्यामुळे त्यातील शेजारी राज्यातील पर्यटकांच्या आणखी पंचवीस हजार गाड्या गोव्याच्या रस्त्यांवर वर्षाकाठी फिरत असाव्यात. त्यामानाने गोव्याचे रस्त्यांचे जाळे तसे अत्यंत विस्तारलेले आहे. गोव्यामध्ये सगळ्या प्रकारचे रस्ते असून एकूण रस्त्यांची लांबी 12500 किलोमीटर आहे. दर माणशी गोव्यात 0.80 वाहने रस्त्यांवर फिरत असतात.

पाठच्या पाच वर्षांतील गोव्यातील अपघातांची आकडेवारी बघितली तर एकूण अपघात झाले. 16825 व मृत्युमुखी पडल्या 1341 व्यक्ती. यंदा गेल्या 9 महिन्यात 195 व्यक्ती बळी पडल्या. गोव्याच्या लोकसंख्येच्या मानाने व राष्ट्रीय सरासरीपेक्षा हे अपघात व मृत्यूदर जास्त आहेत व ती एक चिंताजनक बाब आहे.  त्यामुळे घडणाऱ्या अपघातांचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, जेणेकरून तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना करून अपघातांचे व होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. रस्ता अपघातांची सर्वसाधारण मुख्य कारणे खालील प्रकारे असतात :-

1) वाहन योग्यता संबंधित.

2) चालक योग्यता संबंधित.

3) रस्ता योग्यता संबंधित.

1) आजच्या अद्यावत जमान्यातील तंत्रज्ञानात अतिशय प्रगती झाल्या कारणाने, वाहन योग्यतेत लाक्षणिक सुधारणा झालेली आहे. त्यामुळे ब्रेक निकामी होणे, टायर फुटणे किंवा वाहनात यांत्रिक बिघाड होऊन अपघात होणे असले प्रकार अत्यल्प झालेले आहेत. तसेच हवेच्या पिशव्या, आसनपट्ट्या सारख्या सुरक्षा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशाच्या निष्क्रिय सुरक्षेत वाढ झाली आहे. पण असली सुरक्षा जास्तीत जास्त 60 ते 70 किलोमीटर प्रती तास वेगापर्यंत प्रवाशाला तारू शकते. त्याच्या पुढच्या वेगावर झालेली टक्करीत प्रवाशांना असल्या सुविधा सांभाळू शकत नाही. याच्या उलट बोलायचे म्हणजे हल्लीच्या गाड्या व दुचाक्या एकदम शक्तिशाली असतात व त्या अनियंत्रित वेग सहज गाठू शकतात. त्यामुळे तरुण वर्गाला खास करून दुचाकी बेफाम वेगाने चालवण्याचा मोह होतो व असे अनेक तरुण दुर्दैवाने अपघाताचे बळी ठरतात.

2) चालक योग्यतेमध्ये तीन गोष्टी प्रामुख्याने येतात:-

अ) चालकाचे सर्वसाधारण चालवण्याचे कौशल्य, कसब व प्रतिक्षेप, ज्यांची हल्लीच्या भरगच्च व वेगवान रहदारीत अत्यंत गरज भासते.

ब) चालवण्याचे पूर्ण अनुशासन व शिस्त. रस्त्यावर निर्देशित केलेला मर्यादित वेग ठेवणे, रस्त्यावर असलेल्या सगळ्या खुणांचे व्यवस्थित पालन करणे, लेन सांभाळणे, चालवताना ज्या खाणाखुणा कराव्या लागतात त्यांचे व्यवस्थित पालन करणे, रस्त्यावर कठीण परिस्थितीत पाळायचा मानसिक संयम. एकुणएक सभ्य, परिपक्व व शिस्तबद्ध चालणे.

क) दारूच्या नशेत न येता गाडी सावकाश व सुरक्षित पद्धतीने चालवणे.

3) तिसरे मुख्य कारण म्हणजे रस्त्याची भौतिक स्थिती. रस्त्याची परिपूर्ण भूमिती, रस्त्याची प्रमाणबद्ध उभी व आडवी वक्रता, उंचवटे, बँकिंग, आवश्यक रुंदी, पदपथ, दृष्टीअंतर, रस्ता पृष्ठभाग गुणवत्ता जे सगळे चांगला वेग पाळायला व अपघात टाळायला मदत करतात. 

त्याचप्रमाणे रस्त्यावर पाहिजे असलेले चिन्हफलक, रस्त्यावरची रंगवलेली चिन्हे जी सुरक्षित पद्धतीने चालवायला मार्गदर्शन देतात व निष्क्रिय सुरक्षितता वाढवतात. रस्त्यात तांत्रिकतेत जर गंभीर दोष असले तर एकाच जागेवर वारंवार अपघात होऊ शकतात. त्याला अपघातप्रवण क्षेत्र म्हणतात व काही निकष पार झाला तर त्या जागाला

Goa Traffic Jam
Goa BJP: भाजपची खेळी चालणार का? 'खरी कुजबूज'

कृष्णस्थानामध्ये (ब्लॅक स्पॉट) टाकले जाते.  नंतर अशा कृष्णस्थानांचे तांत्रिकदृष्ट्या शास्त्रोक्त विश्लेषण करून त्यावर उपचारात्मक उपाय सुचवले जातात व ते अंमलात आणले जातात.  त्याच्यामध्ये सक्रिय उपाययोजना म्हणजे रस्ता रुंद करणे, विभाजक घालणे, चौपदरी करून क्षमता वाढवणे, भूमितीत सुधारणा करणे हे मुख्य धरून निष्क्रिय सुधारणा म्हणजे चिन्हफलक लावणे, रस्त्यावरच्या खुणा रंगवणे, गतीरोधक, सिग्नल, संरक्षक कुंपण वगैरे असू शकतात. 

सर्वसाधारण चालकाला रस्त्यावरची चिन्हे किंवा रस्त्यावर रंगवलेल्या खुणा ह्यांचे यथासांग ज्ञान असणे गरजेचे आहे. ह्याबाबतीतील एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे पादचारी पथपद. जागतिक कायद्याप्रमाणे पादचाऱ्याला रस्त्यावरच्या पदपथावर पहिला हक्क असतो व रहदारी पोलिस असो वा नसो, पादचाऱ्याने पदपथावर एकदा पाय ठेवला की सगळी रहदारी ताबडतोब जागच्याजागी थांबली पाहिजे. त्याला रहदारी अनुशासन म्हणतात. पण दुर्दैवाने अज्ञानाने इथे

ह्याची अंमलबजावणी होत नाही.  गाड्या चालवणारे चालक आपण रस्ता विकत घेतल्याच्या आविर्भावात गाड्या चालवतात व पादचारी पथपदावर पादचाऱ्यांच्या सरळ अंगावर घालतात. त्यामुळे वाहतूक पोलिस नसलेल्या पादचारी पथपदावर रस्ता ओलांडणे अक्षरश अशक्य असते किंवा जीव प्रचंड धोक्यात

घालणे असते. ह्याशिवाय खास करून गोव्यात दारूच्या नशेत अतिवेगाने व वेडीवाकडी गाडी चालवणे हे एक अपघातांचे मुख्य कारण आहे.  हल्ली रस्ता अपराध दंडामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आलेली आहे. त्याचे परिणाम दिसण्यास चालू झालेले आहेत. अशी मोठी दंडात्मक कारवाई करणे व चालक परवाना रद्द करणे सारख्या कडक गोष्टी केल्यामुळे रहदारी गैरप्रकारांवर प्रतिबंध लागू शकतो. देशभर अपघाताच्या व त्यांच्यात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत भरमसाठ व चिंताजनक

वाढ होत असल्याने माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्याची नोंद घेऊन सशक्त अधिकृत समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्या राज्य व जिल्हा स्थरावर कार्यविंत असतात व त्यांच्यात सगळ्या सरकारी भागधारकांचा समावेश असतो. त्या रस्ता समस्यांवर वारंवार भेटून चर्चा करून आढावा घेण्याचे व उपाययोजना करायचे काम करतात. केंद्र तसेच राज्य सरकार ह्या क्षेत्रांतील पूर्ण उपाययोजना करण्यात पूर्ण व सतत प्रयत्नशील असतात. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे पाठबळ मिळाल्या कारणाने सगळीकडून उत्तम सहकार्य मिळते व त्याच्यातून नजीकच्या भविष्यात अतिशय उत्साहवर्धक परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com