Margao Bike Theft Dainik Gomantak
गोवा

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

Margao Police Bike Theft Arrest: मडगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा छडा लावत एका 20 वर्षीय सराईत चोराला अटक केली.

Manish Jadhav

मडगाव: मडगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा छडा लावत एका 20 वर्षीय सराईत चोराला अटक केली. रोहित कुमार असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा हरियाणा येथील रहिवासी आहे. मडगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. विशेष म्हणजे, आरोपीकडून चोरीला गेलेल्या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

एकाच वेळी दोन चोरीच्या गुन्ह्यांची उकल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित कुमार याच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना आके येथील एका इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये घडली होती, जिथून त्याने 'पल्सर AS 150' ही दुचाकी लंपास केली होती. तर दुसरी चोरी मडगाव नगरपालिकेच्या पार्किंग क्षेत्राच्या मागून करण्यात आली होती, जिथे त्याने 'ज्युपिटर' स्कूटरवर डल्ला मारला होता. या दोन्ही गाड्यांची एकूण किंमत लाखांच्या घरात आहे.

भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे रोहित कुमारला ताब्यात घेतले. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीची वाहने त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहेत. या दोन्ही गुन्ह्यांची नोंद 'भारतीय न्याय संहिते'च्या (BNS) कलम 303 (2) अंतर्गत करण्यात आली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून मडगाव पोलीस त्याचे इतर कोणाशी संबंध आहेत का, याचा शोध घेत आहेत.

वाहनचालकांना खबरदारीचे आवाहन

मडगाव (Margao) शहर परिसरात वर्दळीच्या ठिकाणी किंवा पार्किंगमध्ये वाहने उभी करताना ती नीट लॉक केलेली आहेत का, याची खात्री करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आरोपी रोहित कुमार हा बाहेरील राज्यातील असल्याने तो गोव्यात किती दिवसांपासून होता आणि त्याने इतर कोठे गुन्हे केले आहेत का, या दिशेनेही तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT