Kokan Railway Dainik Gomantak
गोवा

Kokan Railway: ‘जनशताब्दी’सह अन्य गाड्या कुडाळ, सावंतवाडीतच अडकल्या

कोकण रेल्वे प्रवाशांचे हाल : रूळावर पाणी आल्याने ओढवले संकट; काहींनी स्वीकारला पर्यायी मार्ग

गोमन्तक डिजिटल टीम

Kokan Railway मागील चार पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वे प्रवाशांनाही बसला असून कुडाळ एमआयडीसी येथील रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने मुंबईतून येणारी जनशताब्दी एक्सप्रेस व अन्य मार्गस्थ होणाऱ्या सर्व गाड्या कुडाळ तसेच झाराप व सावंतवाडी येथे अडकून पडल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून हा मार्ग कधी सुरळीत होणार याची प्रतीक्षा प्रवाशांना लागलेली आहे .

बराच कालावधी ओसरून झाला तरी गाड्या मार्गस्थ होत नसल्याने काही प्रवाशांनी गाडीतून उतरून पर्यायी मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनानेही कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या ३ तास उशिराने धावतील, असे जाहीर केले आहे.

यात मडगाव जंक्शन येथून निघणारी ट्रेन क्र.०११४० मडगाव जंक्शन ते नागपूर विशेष गाडी सायंकाळी ७ वाजता ऐवजी रात्री १० वाजता निघणार आहे,असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे

तर ट्रेन क्र. २०११२ मडगाव जं. ते मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस मडगाव जं. येथून सायंकाळी ६ वाजता ऐवजी रात्री ९ वाजता सुटेल.

तर ट्रेन क्र. ११००४ सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्स्प्रेसचा सावंतवाडी येथून सायंकाळी ५.५५ वाजता मार्गस्थ होण्याऐवजी ती रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी मार्गस्थ होणार आहे.

अनेकांची तारांबळ : कुडाळ येथे रेल्वे रूळावर पाणी आल्याने बऱ्याच लांब पल्ल्याच्या ट्रेन्स कुडाळ स्थानकावरच अडकून राहिल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. काही प्रवाशांनी जरी पर्यायी मार्ग स्वीकारून आपापले ठिकाण गाठण्याचा प्रयत्न केला.

तरी काही प्रवाशांना पर्यायी व्यवस्थाही होऊ न शकल्याने मोठे हाल झाले. शिवाय वरून संततधार पावसाची रिपरिप सुरूच असल्याने त्रासात भर पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Fish Market: 'म्हापसेकरांना आणखी संकटात लोटू नये'! म्हापसा पालिकेला मासळी मार्केट अस्वच्छतेवर नोटीस; काँग्रेस करणार स्वच्छता

Shelvan Jetty: '..गावात जेटी होऊ देणार नाही'! शेळवण-कुडचडेवासीयांचा निर्धार; आमदार काब्राल यांची घेतली भेट

Viral Video: डोळ्यांची फसवणूक करणारा भारतीय जुगाड तूफान व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटकरीही अवाक; म्हणाले, 'गजब इंदूर नाही, तर गजब टाटा...'

Kavyashree Kurse: '..बादल पे पाँव है'! काले येथील काव्यश्री कुर्सेने घेतली आकाशझेप; 21व्या वर्षी बनली व्यावसायिक पायलट

1 नाही, 2 नाही 40 कोटींची खोटी बिले! 8 कोटीचा GST घोटाळा; गोव्याच्या व्यापाऱ्याला कोल्हापूर गुप्तचर यंत्रणेच्या पथकाकडून अटक

SCROLL FOR NEXT