Goa Bus Stand | Margao Kadamba Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Goa Bus Stand: मडगावात नवे बसस्थानक उभारणार; प्रकल्पावर मंत्र्यांची दिल्लीत बैठक

Goa Bus Stand: मडगाव कदंब बसस्थानकाची दुरुस्ती व नव्या इमारतीचे बांधकाम सुरु होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Bus Stand: मडगाव कदंब बसस्थानकाची दुरुस्ती व नव्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे. केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांना बैठकीसाठी बोलावले असून कदंब महामंडळाचे कार्यकारी संचालकही त्यांच्या सोबत जाणार आहेत. प्रकल्पावर 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

गेल्या महिन्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्यात आले होते, तेव्हा त्यांनी गोव्यातील रस्त्यांची, कदंब बस स्थानकांची दुरुस्ती, दाबोळी विमानतळ ते वेर्णा पठारापर्यत उड्डाण पूल अशा अनेक प्रकल्पांवर चर्चा केली होती. नवी दिल्लीतील बैठकीत या सर्व विषयांबरोबरच मडगावच्या कदंब बस स्थानकाची दुरुस्ती किंवा नव्या संकुलाचे बांधकाम यावर चर्चा होणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी दिली.

तुयेकर पुढे म्हणाले, मडगाव कदंब बसस्थानकाची दुरुस्ती व नवे संकुल बांधण्यास अंदाजे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. जर पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) पद्धतीने हा प्रकल्प हाती घेतल्यास जी कंपनी याची जबाबदारी घेते, ती 15 ते 20 वर्षांनंतर संकुलाचा ताबा सरकारकडे देईल.

तोपर्यंत सरकारला काही टक्के महसूलही मिळेल. त्यानंतर संकुलाचा ताबा दिला जाईल, तोपर्यंत ही इमारत जुनी झालेली असेल किंवा हा प्रकल्प परत एकदा दुरुस्तीस आलेला असेल, त्यामुळे पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प होणार नाही. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्र गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

कदंब महामंडळाकडे आणखी इलेक्ट्रिक बसेस आल्यानंतर वाहतूक सेवाही सुरळीत होईल. रस्त्यावर इतर बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकार संपतील. तसेच लांब पल्ल्याच्या अंतरावर इलेक्ट्रिक बसेसची व्यवस्था केली जाईल, त्यामुळे वाहतुकीत सुसूत्रता येईल, असेही तुयेकर म्हणाले.

कचरा, सांडपाणी समस्या

मडगाव कदंब बस स्थानकाची स्थिती एकदम ढासळलेली आहे. प्रवाशांसाठीचे शेड मोडकळीस आलेले आहे. वीज, पाण्याचा प्रश्र्न सतावतो आहे. प्रवाशांना आपली वाहने पार्क करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. बसस्थानकाच्या सभोवताली कचरा, दुर्गंधी, सांडपाण्याचे साम्राज्य पसरले आहे, असेही तुयेकर यांनी सांगितले.

150 बसेस मिळणार!

कदंब महामंडळाकडे पुढील महिन्यात आणखी 150 बसेस येण्याची शक्यता आहे. ज्या कंपनीने इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट घेतलेले आहे, ते कदंबला दर किलोमीटर मागे ठराविक रक्कम देतात. बाकी सर्व देखरेख, ही कंपनी पाहते. बसचालक नेमणूकही हीच कंपनी करते. एका इलेक्ट्रिक बसची किंमत जवळ जवळ एक कोटी रुपये असून त्यातील बॅटरीची किंमत 40 लाख रुपये आहे, अशी माहिती तुयेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT