Victor Hospital Goa Dainik Gomantak
गोवा

Victor Hospital Goa: ‘व्हिक्टर’चे ‘आरोग्‍य’ धोक्‍यात! रस्त्याच्याकडेला पसरलंय रासायनिक आणि औषधीय कचऱ्याचे साम्राज्य

इस्‍पितळाजवळच कचरा : रोगराईची भीती; पालिका उदासीन

गोमन्तक डिजिटल टीम

Victor Hospital Goa फातोर्डा येथील व्‍हिक्‍टर इस्‍पितळाजवळ तसेच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. यात थर्माकोल, प्लास्टिक, करवंट्या तसेच औषधीय कचऱ्याचाही समावेश आहे.

भर पावसाळ्यात मागील कित्येक दिवसांपासून हा कचरा आहे त्याच स्थितीत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

मागील वर्षी मडगावात मलेरिया, डेंग्‍यूचे अनेक रुग्ण सापडले होते. कचरा उचल करण्याची जबाबदारी नगरपालिकेच्या स्वच्‍छता विभागाची आहे. मात्र या कचऱ्याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे असा आरोप नागरिक करीत आहेत.

जुन्‍या रेल्वे स्थानकापासून नव्या रेल्वे स्थानकावर येण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या कडेला चार-पाच ठिकाणी कचऱ्याच्‍या राशी दिसून येतात. यात प्रामुख्‍याने मालभाट व्हिक्टर हॉस्पिटलसमोर रासायनिक तसेच औषधीय कचरा साचला आहे.

या कचऱ्यात प्लास्टिक, थर्माकोल, तोडलेल्या झाडांच्या फांद्या, नारळाच्‍या करवंट्यांचाही समावेश आहे. त्याच मार्गाने पुढे गेल्यावर इतर तीन-चार ठिकाणीही कचरा दिसतो. मागील कित्येक दिवसांपासून तो तसाच पडून आहे. या कचऱ्यात घातक वस्तूंचाही समावेश आहे.

आम्हाला आपत्कालीन सेवेसाठी कॉल आल्यावर आणि अन्य मार्गांत अडथळा आल्यावर अनेक वेळा या रस्त्याचा उपयोग करावा लागतो. मात्र या रस्त्यावर कचऱ्याच्‍या राशी असल्‍याने नियोजित ठिकाण गाठणे शक्‍य होत नाही. हा कचरा हटविण्यासाठी नगरपालिकेकडे पत्रव्यवहारही केला आहे. परंतु अजून पूर्तता झालेली नाही.

- गिल सौझा, कार्यकारी अधिकारी, मडगाव अग्निशमन दल

दक्षिण गोवा अग्निशमन दलाच्या कार्यालयापासून तळेबांद येथे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या कडेलाही पालिकेच्या स्वच्‍छता विभागीय कर्मचाऱ्यांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया दररोज करण्यात येते.

मात्र येथील कचरा उचल दरदिवशी होत नसल्याने अनेक जण रात्रीच्या वेळी काळोखाचा फायदा घेऊन कचऱ्याने भरलेल्‍या गोण्‍या तेथे आणून टाकतात.

हा परिसर स्थानिक नगरसेविका लता पेडणेकर यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने येथील परिसरात नाराजी पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: रुमडामळच्या ४ अपात्र पंच सदस्यांना १६ ऑगस्टपर्यंत स्थगिती

बाथरुममध्ये ढसाढसा रडला होता विराट कोहली; युजवेंद्र चहलने सांगितला वर्ल्ड कपमधील ‘त्या’ पराभवाचा किस्सा!

Nishaanchi: 'दिल थामिऐ, जान बचाइए'! बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये झळकणार; नुसत्या पोस्टरनेच घातलाय धुमाकूळ

Kidney Infection: किडनी इन्फेक्शन म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि बचावात्मक उपाय!

SCROLL FOR NEXT