Goa News  Dainik Gomantak
गोवा

Viresh Borkar: आयएफबी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा

Viresh Borkar: रोजगार गमावलेल्या 130 जणांना पाठिंबा

दैनिक गोमन्तक

Viresh Borkar: तीन वर्षांच्या सेवेनंतर नियमित करण्याची मागणी करणाऱ्या गोव्यातील 130 तरुणांकडे असंवेदनशील भाजप सरकारने डोळेझाक केली आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

आयएफबी व्यवस्थापनाशी देखील एक सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी बोलणी करण्याची माझी तयारी आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

वेर्णा औद्योगिक वसाहतीत आज आयएफबीच्या संपावर असलेल्या कामगारांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा, एव्हरसन वालीस, कॅप्टन विरियातो फर्नांडिस, मोरेनो रिबेलो आदी उपस्थित होते.

भाजप सरकारने काँग्रेसचा जाहीरनामा लागू करावा. ज्यामुळे गोव्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही 500 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे जाहीरनाम्यात वचन दिले होते, असे आलेमाव म्हणाले.

2012 मध्ये बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिलेले भाजप सरकार तीन निवडणुकांनंतरही स्वत:चे निवडणूक आश्वासन पूर्ण करू शकले नाही, हे खेदजनक आहे. आज दहा वर्षांनंतर ते ना बेरोजगारी भत्ता देत आहेत, ना नोकऱ्या देत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

आमदार बोरकर यांचे कामगारमंत्र्यांना निवेदन

आयएफबीच्या संपावरील कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार विरेश बोरकर यांनी कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात व कामगार आयुक्त राजू गावस यांची भेट घेतली. कामगारांच्या समस्या सोडविण्याबाबत कंपनी व्यवस्थापनाची उदासीनता त्यांनी दोघांच्या निदर्शनास आणून दिली.

नोकरीची सुरक्षितता व कामावर परत रुजू झाल्यावर सतावणूक होता कामा नये, अशा आशयाचे निवेदन त्यांनी यावेळी आयुक्त व कामगारमंत्र्यांना दिले. कामगार मंत्र्यांकडून या कामगारांच्या विषयावर सकारात्मक उत्तर मिळाले नाही, परंतु पुढे राज्यातील कामगारांबद्दलचा विषय येत्या विधानसभा अधिवेशनात मांडू, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT