Election  Dainik Gomantak
गोवा

Margao Goa: मडगावातील तृतीयपंथीयांना पहिल्यांदाच मिळणार मतदानाची संधी

Margao Goa: आम्हाला आमची मतदान कार्ड गोळा करण्यासाठी येथे बोलावण्यात आल्याने खूप आनंद होत आहे- झरीन

Ganeshprasad Gogate

Margao Goa: मडगाव मधील 'ट्रान्सजेंडर' अर्थात तृतीय पंथीय व्यक्ती पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मडगाव येथील झरीन आणि हिना ट्रान्सजेंडर रहिवासी आहेत.

मतदार दिनी त्यांचे मतदान कार्ड गोळा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले हा आमच्यासाठी आनंदोत्सव असल्याचे त्यांनी म्हटले असल्याची माहिती मिळाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या शुभारंभाच्या सहभागाचे प्रतीक आहे. आम्हाला आमची मतदान कार्ड गोळा करण्यासाठी येथे बोलावण्यात आल्याने खूप आनंद होत आहे.

ट्रान्सजेंडर म्हणून, आम्ही पहिल्यांदाच मतदान करणार आहोत. आम्हाला मतदानाचा अधिकार आहे, असे झरीनने सांगितले. ॉ

हिनाने अशीच भावना व्यक्त केली. मडगावमधील 20 पैकी 11 ट्रान्सजेंडर व्यक्तींनी दक्षिण गोव्यात त्यांचा मतदानाचा हक्क मिळवला आहे. उत्तर गोव्यात ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

या समुदायाच्या अधिकारांबाबत माहिती घेतल्यावर असं समजलंय की, या समुदायाच्या मा. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

यावर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने वर्ष 2014  मध्ये या समुदायाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळावा, संविधानातील मूलभूत मूल्यांच्या आधारे न्याय मिळावा, याबद्दलचा क्रांतिकारक निर्णय दिला होता.

स्वत:चं लिंग ठरवण्याचा अधिकार व्यक्तीला असावा, आणि ही ओळख स्त्री आणि पुरुष या दोन्हीपेक्षा अन्यही असू शकते, हे न्यायालयाने मान्य केले. 

केवळ या ‘वेगळ्या’ ओळखीमुळे देशात कोणीही कुठेही ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्याच्या मूलभूत हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही,  किंबहुना नागरिक म्हणून त्याचे हे सर्व अधिकार सुरक्षित आहेत, हेही न्यायालयाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT