Naresh Sawal
Naresh SawalDainik Gomantak

MG Party: नरेश सावळ यांनी सांगितली 'मगो' सोडण्यामागची कारणं; डिचोलीत समर्थकांनीही ठोकला पक्षाला रामराम

MG Party: ढवळीकर बंधूना इशारा देत म्हणाले, तुमची काळी कृत्ये..
Published on

MG Party: डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाच्या कार्यकारी समिती अध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर आता डिचोलीतील समर्थकांचाही मगोला रामराम केलाय.

शुक्रवारी प्रजासत्ताक दिनी डिचोलीत झालेल्या कार्यक्रमावेळी युवा वर्गासहीत महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. या सर्वांनी सामूहिकरित्या राजीनामा दिला आहे.

यावेळी सावळ यांनी डिचोलीत पत्रकार परिषद घेत पक्ष सोडण्यामागील त्यांचे कारण केले स्पष्ट केले आहे.

Naresh Sawal
Margao City: शहरातील 'त्या' इमारती कोसळून लोकांचा जीव घेण्याचा सरकारचा इरादा आहे का? इतिहासकारांचा संतप्त सवाल

सावळ यांनी पत्रकार परिषदेत मगोच्या ढवळीकर बंधूवर टीका केली आहे. ढवळीकर बंधूंना फक्त स्वतःचाच विचार असून लवकरच त्यांची काळी कृत्ये उघडी पाडणार असल्याचा इशारा नरेश सावळ यांनी दिलाय. सावळ यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा डिचोलीसहित राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

2007 च्या पराभवानंतर 2011 पर्यंत विश्वजीत राणे यांनी माझी सर्व कामे केली. गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या पक्षाचे नसतानाही मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि सदानंद शेट तानावडे यांनी माझी विचारपूस केली.

पण ढवळीकर बंधूनी कधीच चौकशी केली नाही. ते सत्तेसाठी काहीही करू शकतात असा घणाघात नरेश सावळ यांनी यावेळी केलाय.

ज्या पक्षाला आमची कदर नाही तो पक्ष आम्हाला नको - सावळ

त्यांना दोन भावांशिवाय अन्य कोणीही निवडून आलेले चालत नाही. आम्ही मतदार संघातल्या समस्या मांडत गेलो परंतु पक्षाच्या वरिष्ठांनी नेहमीच आमच्या मागण्यांकडे आणि समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

ज्यापक्षाला आमच्या मतदार संघातील विकास नको असेल, ज्यांना आमच्या मतदार संघातील मुलांच्या भवितव्याची चिंता नसेल अशा पक्षाची आम्हाला गरज नसल्याचा घणाघात सावळ यांनी यावेळी केला.

आम्ही नरेश भाईंच्या पाठीशी- कार्यकर्त्यांचा एल्गार

डिचोली मतदार संघातील सर्वांनी एकत्र येत हा कार्यक्रम केला कार्यकर्त्यांनी सांगितले. 18 तारीखचा निर्णय योग्य असून आम्ही नरेश भाईंच्या पाठीशी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

नरेश भाईकडे विकासाचे व्हिजन असून त्यांनी ठरवलेली कामे ते निवडून न आल्याने झाली नसल्याची खंत यावेळी उपस्थित महिला वर्गाने बोलून दाखवली.

यावेळी तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com