Aleixo Sequeira  Dainik Gomantak
गोवा

Margao Court Parking Issue: कोर्ट परिसरातील पार्किंगचा प्रश्‍न लवकर सुटणार! कायदामंत्र्यांचा शब्द; नागरिकांनी मांडल्या विविध समस्या

Aleixo Sequeira On Margao Parking: या न्यायालयात येणाऱ्या वकील व त्यांच्या अशिलांना तसेच न्यायालयातील कर्मचाऱ्यांना पार्किंगचा मोठा प्रश्न सतावतो आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: सध्या मडगावात दोन न्यायालये आहेत. एक जुन्या इमारतीत व दुसरे नव्याने बांधलेले जिल्हा सत्र न्यायालय. आता जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला आणखी एका न्यायालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

मात्र, या न्यायालयात (Court) येणाऱ्या वकील व त्यांच्या अशिलांना तसेच न्यायालयातील कर्मचाऱ्यांना पार्किंगचा मोठा प्रश्न सतावतो आहे. त्यांच्यासाठी पार्किंगसाठी बाजूलाच जागा संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या जागेचे मालकही जागा देण्यास तयार आहेत. यासंदर्भात जमीनमालकांकडे आपली चर्चा झाली असून नूतन इमारतीचे बांधकाम संपेपर्यत पार्किंगसाठीची जागा ताब्यात येईल, असे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

अनेक लोकांनी आपल्यापुढे आपल्या समस्या व प्रश्न मांडले. त्यात कोलवा येथील शाळेला बांधकामासाठी सरकारी मंजुरी हवी होती. यासंदर्भात आपण पुढील सात दिवसांत त्यांना मंजुरी मिळवून देऊ किंवा सरकारपुढे असलेल्या फाईलचा काय तो सोक्षमोक्ष लावू, असे मंत्र्यांनी सांगितले.

२० कलमी कार्यक्रमाखाली जे भाडेकरू राहतात, त्यांच्या भाडेकरू पडताळणीबद्दल काही प्रश्न घेऊन लोक आले होते. त्याचप्रमाणे राय येथे पाईपलाईनसाठी रस्ता खोदल्याने त्रास होत असल्याची लोकांनी आपली गाऱ्हाणी मांडली. पाईपलाईनचे काम संपल्यावर लगेच रस्ता पूर्ववत करून देण्याचे आश्वासन आपण त्यांना दिल्याचे मंत्र्यांनी सागितले.

यंदा प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम सकाळी ९.१५ ऐवजी ८.१५ वाजता निश्र्चित केला आहे. या वेळेच्या बदलाबद्दल स्वातंत्र्यसैनिकांनी आक्षेप घेतला आहे. काही स्वातंत्र्यसैनिकांनी मंत्री सिक्वेरा यांची भेट घेऊन त्यांना वेळ पर्वीप्रमाणे करण्याची विनंती केली आहे. यंदा वेळ बदलणे शक्य नसले तरी पुढील वर्षापासून हा कार्यक्रम सकाळी ९.१५ वाजता सुरू करण्यासाठी आपण सरकारकडे प्रयत्न करणार आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

कोमुनिदाद इमारतीचे नूतनीकरण करू

मडगावच्या (Margao) कोमुनिदाद इमारतीच्या नूतनीकरणासाठीची फाईल सरकारकडे पाठवली आहे व सरकारची मंजुरी मिळाल्यावर पीडब्ल्यूडी वर्क डिव्हिजन आठतर्फे हे काम हातात घेतले जाईल.

वीज खात्याच्या भूमिगत केबलिंगमुळे रस्त्यावरील विजेच्या खांबांची लोकांना अडचण होऊ लागली आहे. हे खांब त्वरित तिथून हटविण्याचा आदेश आपण वीज खात्याला दिला आहे.

माजोर्डा, बेताळभाटी, कलाता, डोंगरी येथे पिण्याच्या पाण्याची जी समस्या उद्भवली आहे ती सात दिवसांत सोडवून नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन मंत्री सिक्वेरा यांनी संबंधितांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

Video: लष्करी अधिकाऱ्याची दादागिरी! श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा मोडला

SCROLL FOR NEXT