Amit Aatkar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी दाखविले धाडस

Amit Patkar: डॉ. सावंत यांनी नीती आयोगाची उडविली खिल्ली

दैनिक गोमन्तक

Amit Patkar: गोव्यातील 1.10 लाख बेरोजगारांच्या अहवालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नीती आयोगाची खिल्ली उडविण्याचे धाडस भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाखविल्याबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करीत आहोत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

डॉ. प्रमोद सावंत यांनी 102 टक्के कोविड लसीकरण सिद्धांताचा शोध लावला होता. भाजपने त्यांना लवकरच बक्षीस देण्याची गरज आहे. शाखेवर घेतलेल्या शिक्षणाचे हे उत्तम उदाहरण आहे, अशी बोचरी टीकाही काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

गोव्यातील बेरोजगारीची नीती आयोगाची आकडेवारी चुकीची असून गोव्यात केवळ 20 हजार बेरोजगार आहेत असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत काँग्रेस अध्यक्षांनी भाजपला मुख्यमंत्र्यांच्या हुशारीबद्दल त्यांना बक्षीस देण्याची विनंती केली आहे.

रोजगार विनिमय खात्याने ठेवलेली आकडेवारी सदोष असल्याचा दावा करून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याच सरकारची खिल्ली उडवली आहे. मी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतो. शाखांवर धडे घेतलेल्या व्यक्तीकडून आम्ही काय अपेक्षा करू शकता असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

पाटकरांचे मुख्यमंत्र्यांना सवाल

सत्तरी येथील भाजप पदाधिकाऱ्याच्या कारखान्यातून जप्त करण्यात आलेल्या कॅटामाईन ड्रग्जचा तपास अहवाल सार्वजनिक करावा, असे मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. सिद्धी नाईकच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा तपास का बंद करण्यात आला यावर त्यांनी उत्तर द्यावे. सोनाली फोगट मृत्यू प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी कर्लीस रॅस्टोरंटचे बांधकाम घाईघाईत पाडले होते का? या प्रश्‍नांची उत्तरे डॉ. प्रमोद सावंत यांनी द्यावीत, असे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT