Goa News | Market Dainik Gomantak
गोवा

Goa News: म्हार्दोळ बाजारात सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर

Goa News: म्हार्दोळ बाजार परिसरात प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: म्हार्दोळ बाजार परिसरात प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. ग्राहक व विक्रेत्यांमध्ये जागृती करण्याबरोबरच पाच विक्रेत्यांना प्लास्टिक वापरल्याबद्दल दंडही केला होता. त्यानंतर संबंधित खात्याचे अधिकारीही बाजाराला भेट देऊन गेले.

तरीही बाजारात विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे होताना दिसत आहे. म्हार्दोळ येथील साप्ताहिक सोमवारच्या बाजारात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने वेलिंग-प्रियोळ- कुंकळ्ये पंचायतीने जनजागृती केली होती.

यावेळी सरपंच हर्षा गावडे, उपसरपंच, पंचसदस्य तसेच पंचायत सचिव सुशांत नाईक आदी उपस्थित होते. सरकारने निर्धारित केलेल्या प्रमाणातील प्लास्टिकचा वापर करण्यासंबंधीचा सल्लाही व्यापारी व विक्रेत्यांना अधिकाऱ्यांनी दिला असला तरी त्यांची पाठ फिरताच पुन्हा पातळ प्लास्टिक पिशव्या वापरासाठी बाहेर काढल्या जात आहेत.

छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी प्लास्टिकच्या पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई का करत नाही, असा सवाल या केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Attacks On Police: '..उद्या हे गुन्हेगार पोलीस स्थानकांत घुसून हल्ला करतील', कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा LOP युरींचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; चवथीला नारळाच्याच पोटल्या द्या ना!

Goa Crime: खंडणीखोर 'वॉल्‍टर गँग'च्या म्‍होरक्‍याला अटक! मुंगूलमध्ये झाला होता खुनी हल्ला; गन आणि गोळ्या जप्त

Goa Education Loan: गोव्यात 481 कोटींची शैक्षणिक कर्जे थकीत, 5108 खाती NPA मध्‍ये; केंद्र सरकारचा अहवाल

Goa Rain: 'तिलारी' धोकादायक पातळीवर! पूर, पडझड, वाहतुकीची कोंडी! गोव्यात पावसाचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT