Goa Forest Dainik Gomantak
गोवा

Goa Forest: केंद्राकडून गोवेकरांना लॉटरी; वनक्षेत्रात घर बांधायला हिरवा कंदील

Goa Forest: गोवा, उत्तराखंडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या पत्रात नमूद

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Forest:- घराजवळ लावलेल्या झाडांची नोंद 'खासगी वनक्षेत्र' म्हणून झाली असेल तर आता त्या जागी राहते घर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय असलेल्या घरांचाही 250 चौरस मीटरपर्यंत विस्तार करता येणार आहे.

खासगी वनक्षेत्रात अशा घराचे बांधकाम करण्यास परवानगी देता येईल, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. गोवा आणि उत्तराखंडमधील डोंगराळ भागांचा यासाठी वेगळा विचार करण्यात आला आहे.

केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने गोवा सरकारला पाठवलेल्या पत्रानुसार, गोव्यातील खासगी वनक्षेत्रातील घरांच्या मालकांना निवासी इमारती बांधण्याची परवानगी दिली आहे.

तथापि, अशा जमिनीवर संस्थात्मक आणि व्यावसायिक इमारती बांधण्यावर नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार बंदी कायम आहे. गोवा आणि उत्तराखंडसंदर्भात 29 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्रालयाशी संलग्न असलेल्या वन सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

पूर्वी परवानगी नसलेले बांधकाम वनसंरक्षण कायदा किंवा वन (संरक्षण, संवर्धन) संदर्भातील तरतुदीनुसार आता करता येणार आहे.

  • मार्गदर्शक तत्त्वे अशी....

  • खासगी जंगलात निवासी उद्देशासाठी बांधकामास केवळ घरगुती कारणासाठी परवानगी दिली जाईल.

  • कोणत्याही संस्थात्मक इमारती किंवा व्यावसायिक विकासासाठी बांधकामाचा वापर करता येणार नाही.

  • बांधकाम प्रत्येक बाबतीत कमाल 250 चौरस मीटर क्षेत्रापर्यंत मर्यादित असेल.

  • खासगी जंगलात निवासी इमारतीच्या बांधकामाला परवानगी आहे.

  • फक्त घरमालकांना त्यांच्या निवासी इमारती बांधण्यासाठी/पूर्ण करण्यासाठीचा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

  • 11 फेब्रुवारी 2011 पूर्वी त्याजागी निवास करणारेच या सवलतीस पात्र ठरतील.

  • खासगी वनक्षेत्राचे अनेक मालक असले तरी 250 चौरस मीटर क्षेत्रात एकच घर बांधता येईल.

  • शिवाय किमान वृक्षतोड असावी.

  • मृदसंधारणाच्या पुरेशा उपाययोजना कराव्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saudi Aramco Missile Attack: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, क्राउन प्रिन्सच्या इशाऱ्यानंतर हूतींची काही तासांतच दुप्पट वेगाने कारवाई VIDEO

खरी कुजबुज: शतक कोण ठोकणार, 'बोल्‍ड' कोण होणार?

Land Mutation Process: 'म्युटेशन'साठी 50 हजारांपर्यंत वसुली? दक्षिण गोवा वकील संघटनेचा भ्रष्टाचाराचा आरोप

Horoscope 14 Oct 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! 'या' 5 राशींचं चमकणार नशीब; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

SCROLL FOR NEXT