VIP Number Plate: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महसूल प्राप्ती संबंधी एक महत्वाची बातमी हाती येतेय. बार्देश आरटीओ कार्यालयाने मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत VIP नंबर शुल्कातून तब्बल 6.30 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला असून 2173 हून अधिक VIP नंबर देण्यात आलेत.
सध्या ग्राहकांमध्ये VIP नंबरची बरीच क्रेझ असून त्यांना त्यांच्या वाहनांसाठी विशेष पसंती क्रमांक हवा असतो. आपल्या हौसेसाठी ते लागेल तेवढे शुल्क भरण्यास देखील ते तयार असतात. अशी माहिती आरटीओ विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
त्यांनी अशीही माहिती दिली की, जर एकाच क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास सर्वाधिक बोली लावणाऱ्याला तो क्रमांक मिळतो.
काही ग्राहक नोंदणी क्रमांक त्यांच्या आयुष्यातील विशेष दिवस म्हणून किंवा जन्मकुंडली किंवा अंकशास्त्रानुसार भाग्यवान क्रमांक वगैरे काढतात आणि तो नंबर घेण्याकडे त्यांचा कल असतो.
आपल्याला हवा तो नंबर मिळवण्यासाठी बरेच ग्राहक थांबून राहतात किंवा हव्या असलेल्या सिरींजवर लक्ष ठेऊन असतात आणि विशष म्हणजे जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ थांबून ते अतिरिक्त शुल्क भरण्यासही मागेपुढे बघत नाहीत.
0001 ते 0009 पर्यंतच्या संख्यांचा समावेश असलेल्या सिरीजमध्ये ग्राहकांची विशेष पसंती आहे. तसेच संख्येमधील समान शेवटचे अंक उदा. 0011, 0022, 0033, 0111, 0222, 0333 इत्यादी सारख्या सिरीज जास्त विकल्या जातात अशीही माहिती त्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.