Panaji Accident : मळा अपघाती मृत्यू प्रकरणाचा अहवाल दोन दिवसांत तयार होणार : सीईओ संजित रॉड्रिग्ज

Panaji Accident :चौकशी अहवालातून युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल
CEO Sanjit Rodriguez
CEO Sanjit RodriguezDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Accident : पणजी, मळा येथे अपघातात तरुणाच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोन दिवसांत चौकशी अहवाल तयार होईल, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा व्यवस्थापकीय संचालक (एमडी) संजित रॉड्रिग्ज यांनी दिली.

स्मार्ट सिटीच्या कामात कंत्राटदाराने कोणत्याही उपाययोजना उपलब्ध केल्या गेल्या नाहीत, हे आपणास मान्य नाही. या प्रकरणातही काही उपाययोजना केल्या होत्या, पण मला आताच त्यावर टिप्पणी करायची नाही. चौकशी होऊ द्या, सर्व वस्तुस्थिती समोर येऊ द्या. एक दोन दिवस थांबा, आम्ही या घटनेची सर्व वस्तुस्थिती समोर आणू, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

चौकशी अहवालात आणखी काही सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या लागतील, असे सुचवले तर आम्ही त्या करू, असेही ते म्हणाले. अहवाल आल्यानंतर आम्ही मानवाधिकार आयोगाला उत्तर देऊ. नुकतेच आयोगाने आम्हाला नोटीस बजावली आहे. अहवालाची माहिती सार्वजनिक केली जाईल, असे सांगून रॉड्रिग्ज म्हणाले, अपघात झाला त्या ठिकाणी सर्व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत.

बिहारमधील मजूर अंगद कुमार (२८) याचा ऑक्टोबर २०२३ मध्ये रायबंदर येथे स्मार्ट सिटी कामाच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला होता.

तसेच २१ वर्षीय रायबंदर येथील आयुष हळर्णकरचा १ जानेवारीला मळा येथे स्मार्ट सिटी मिशनंतर्गतच्या मलनिस्सारण चेंबरच्या खड्ड्यात दुचाकीसह पडून मृत्यू झाला.

उशिरा सुचलेले शहाणपण का?

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत मलनिस्सारण सुविधा निर्माण करणाऱ्या कंत्राटदाराने मळ्यातील अपघातानंतर आता शहरातील सर्वत्र खड्ड्याच्या भोवताली ठेवलेल्या बॅरेगेट्सला रिफ्लेक्टर बसविले आहेत.

लोखंडी पत्र्यांवर, लाकडी खांबावरही रिफ्लेक्टर लावले गेले आहेत. त्याशिवाय वाहनधारकाला समजेल असे इलेक्ट्रॉनिक बॅटरीवरील बल्बचीही सोय केलेली आहे. अपघातानंतर केलेले हे उपाय आहेत, हे आता पणजीकरांनाही दिसून येत आहे.

उत्पल गरजले

पणजीतील नागरिक स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेक समस्यांना तोंड देत आहेत. शहरातील व्यावसायिकांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांचा व्यवसाय बंद पडला आहे. एक-एक महिना रस्त्याच्या कामाला लागत असल्यानंतर व्यावसायिकांना दुकान बंद ठेवण्याशिवाय पर्याय रहात नाही.

या कामांचे सुरक्षा ऑडिट, क्वॉलिटी ऑडिट, काम वेळेत पूर्ण करण्याची अट, वाहतूक कोंडी होणाऱ्या विशेष ठिकाणी विशेष लक्ष पुरविणे, स्थानिक व्यावसायिकांशी व नागरिकांशी संवाद साधला जावा, अशा मागण्यांचे निवेदन पर्रीकर यांनी सीईओ रॉड्रिग्स यांना दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com