Goa Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Jam: पणजीतील वाहतूक कोंडी संपणार कधी?

Goa Traffic Jam: विशेष म्हणजे सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 7 च्या सुमारास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झालेली पाहायला मिळतेय.

Ganeshprasad Gogate

Goa Traffic Jam: नववर्षाच्या स्वागतासाठी दाखल झालेल्या पर्यटकांसोबतच पणजीत येणाऱ्या सर्वानाच सध्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय.

पर्वरी पासून मांडावी पुलापर्यंत वाहनाच्या रांगा लागत असून यात कित्येकवेळा रुग्णवाहिकाही अडकल्याचे चित्र या अगोदर दिसून आलंय.

विशेष म्हणजे सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 7 च्या सुमारास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झालेली पाहायला मिळतेय.

त्यात पुन्हा स्मार्ट सिटीच्या नावाखाली पणजीतील खोदलेले रस्ते हे देखील वाहतूक कोंडीचे महत्वाचे करम बनले आहेत. रस्त्यांवर मातीचे ढिगारे ठेवल्याने रस्ते अरुंद बनले असून वाहतूक कोंडीला निमंत्रण दिल्याचेही दिसतेय.

तसेच वाहन पार्किंगसाठीही जागा मिळत नसल्याने कारचालक जिथे मोकळी जागा मिळेल त्या ठिकाणी गाड्या पार्क करीत आहेत.

पणजी सोबतच गोव्यात कुठ्ठाळी, पणजी मडगाव महामार्गावरील वेर्णा बिर्ला जंक्शनवर वाहतूक रोडावत असल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

पणजीहून येणारी वाहने वेर्णा वाहतूक सिग्नलकडे पोचताच धीमी होतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून बघायला मिळतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Smart Glasses: "सावधान! तुमचे खाजगी क्षण कोणीतरी पाहतंय!" मेटा चष्म्यांनी टिपलेले व्हिडिओ होतायत लीक; केनियातील डेटा वर्कर्सचा धक्कादायक खुलासा

Morgan Stanley Layoffs: "70 अब्ज डॉलर्सचा नफा, तरीही नोकरीवर गदा!" मॉर्गन स्टॅनलीनं 2500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; 'हे' कारण ठरलं नोकरी जाण्याचं

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

गोव्याचा फिरकीपटू मोहित रेडकर बीसीसीआय शिबिरात, हरभजन सिंग देणार 'गुरुमंत्र'

SCROLL FOR NEXT