Night Clubs Dainik Gomantak
गोवा

आवाज कमी कर डीजे तुला...! मांद्रे, मोरजीत रात्रौ 10 नंतरही पार्ट्यां सुरुच; प्रशासनाचे दुर्लक्ष, स्थानिक हैराण

Noise pollution on morjim mandrem beaches: पोलिसांना या सर्व प्रकाराबद्दल कळवून देखील पोलिसांनी घटनास्थळी येऊन बघण्याची तसदीही घेतली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Ganeshprasad Gogate

Noise pollution on morjim mandrem beaches: कासवांच्या घरट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोरजी आणि मांद्रे किनारपट्टी आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय.

किनाऱ्यानजीकच्या हॉटेल्स, पबमध्ये रात्रौ 10 नंतर कानठळ्या बसवणारे संगीत आणि हुल्लडबाजीचे प्रकार सध्या मोरजी-मांद्रे भागात नियमितपणे घडत असल्याने स्थानिकांनी या विरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला आहे.

विशेष म्हणजे पोलिसांना या सर्व प्रकाराबद्दल कळवून देखील पोलिसांनी घटनास्थळी येऊन बघण्याची तसदीही घेतली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहिती नुसारमोरजी -मांद्रे या किनारपट्टीवर मागील काही महिन्यांपासून हॉटेल्स, पब सारख्या आस्थापनांमध्ये कानठळ्या बसवणारे संगीत रात्रौ 10 नंतर सुरु असून याचा परिणाम येथील स्थानिकांच्या जीवनमानावर होत आहे.

याच्या विरोधात स्थानिकांनी वेळोवेळी आवाज उठवून देखील म्हणावा तसा प्रतिसाद पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे आश्वे, मोरजी, मांद्रे हे समुद्र किनारे समुद्री कासवांच्या घरट्यांसाठी प्रसिद्ध असून या किनाऱ्यांवर कासवे परंपरागतरीत्या अंडी घालण्यासाठी येतात.

यात ऑलिव्ह रिडले जातीची कासवे प्रामुख्याने येत असल्याचो दिसून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रखर प्रकाशझोत आणि ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गोष्टी टाळणे आवश्यक असल्याचे र्यावरण शिक्षण केंद्राचे मुख्य संशोधक सुजीतकुमार डोंगरे यांनी म्हटले होते.

मात्र संबंधित आस्थापनांकडून या गोष्टीला तिलांजली दिल्याचे स्प्ष्ट दिसते. रात्री 10 नंतर राज्यात ध्वनी प्रदूषणास करण्यास बंदी असली तरी किनारी भागात सर्रास हे नियम मोडले जातात.

मोठ्या प्रमाणात संगीत रजनींचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. सरकारी यंत्रणांच्या आशीर्वादाने रात्रभर मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते असे स्थानिकांचे लोकांचे म्हणणे आहे.

रात्री दहानंतर येणारे अनेक पर्यटक किनारी भागातील पाटर्यांकडे मोर्चा वळवत असल्याने संपूर्ण किनारपट्टी भागात अक्षरशः सनबर्नचा माहोल दिसून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT