Holi Special Train: होळीच्या पार्श्वभूमीवर खुशखबर! 34 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ; संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Holi special train extension: होळी व उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३४ विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ दिली आहे.
Holi special train extension
Holi special train extensionDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: होळी व उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३४ विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे होळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या गाड्यांचे आरक्षण आजपासून (ता. १६) सुरू झाले आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०४७१५ बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी २८ फेब्रुवारीपर्यंत अधिसूचित होती; ती आता २८ मार्चपर्यंत दर शनिवारी धावणार आहे. परतीची ट्रेन क्रमांक ०४७१६ साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष १ मार्चऐवजी २९ मार्चपर्यंत दर रविवारी चालवण्यात येईल.

Holi special train extension
Konkan Railway: फुकट्यांचा 'गेम ओव्हर'! कोकण रेल्वेची मोठी कारवाई; विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केला 22 कोटींचा दंड

ट्रेन क्रमांक ०४७२५ हिसार-खडकी साप्ताहिक विशेष २२ फेब्रुवारीपर्यंत नियोजित होती. ती आता २९ मार्चपर्यंत दररविवारी धावेल. ट्रेन क्रमांक ०४७२६ खडकी-हिसार विशेष २३ फेब्रुवारीऐवजी ३० मार्चपर्यंत दर सोमवारी चालवली जाईल. ट्रेन क्रमांक ०९६२५ अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष २६ फेब्रुवारीऐवजी २६ मार्चपर्यंत दर गुरुवारी धावेल, तर ट्रेन क्रमांक ०९६२६ दौंड-अजमेर विशेष २७ मार्चपर्यंत दर शुक्रवारी वाढवण्यात आली आहे.

Holi special train extension
Train Accident: काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालत्या ट्रेनवर कोसळले क्रेन, 22 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु VIDEO

ट्रेन क्रमांक ०९६२७ अजमेर-सोलापूर विशेष २५ फेब्रुवारीऐवजी २५ मार्चपर्यंत दर बुधवारी धावेल. ट्रेन क्रमांक ०९६२८ सोलापूर-अजमेर विशेष २६ मार्चपर्यंत दर गुरुवारी चालवण्यात येणार आहे. रेल्वेने स्पष्ट केले की, या सर्व गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग, थांबे व रचना यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com