Iron ore transportation काले रेल्वे यार्डातून होणाऱ्या लोहखनिजाच्या वाहतूकीविरोधात पंचायत सदस्य एकवटले असून त्यांनी या प्रकाराला कडाडून विरोध केलाय. ग्रामपंचायत अशा प्रकारांना परवानगी तरी कशी देते असा संतप्त सवाल स्थानिकांनी विचारलाय.
काले येथे रेल्वेच्या माध्यमातून हा माल आणला जात असून तो माल स्थानिक वस्तीजवळ उतरवला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकारावर ग्रामपंचायत सरपंच मूग गिळून गप्प बसले असून माल उतरवण्याची परवानगी पंचायतीला कोणी दिली? तसेच जर ग्रामपंचायतीला याबद्दल विचाराणाच झाली नसेल तर ग्रामपंचायत असण्याला काय अर्थ आहे असा प्रश्नही उपस्थितांनी विचारलाय.
तसेच याआधी आमदारांना याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती मात्र विनंती करूनही त्यांनी यात लक्ष घातले नाही असा नाराजीचा सूर त्यांनी यावेळी आळवला.
प्रदूषण मंडळही याप्रकारावर गप्प असून या परिसरात मंडळानेच बेकायदेशीर कृत्ये केली असल्याचा सनसनाटी आरोप यावेळी ग्रामस्थांनी केलाय.
हा प्रकार किती दिवसांपासून सुरु आहे? तसेच याआधी रेल्वेने कितीवेळा असा माल याठिकाणी उतरवला या संबंधीचीही सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झाली नाहीय.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.