Indian Medical Association Installation Ceremony
राज्यात मृत्यूशी झुंज देत असलेली व्यक्ती आता आपल्याला कसे मरण पाहिजे याचा निर्णय घेऊ शकते. जगण्याची शक्यता कमी असेल तर कोणत्या प्रकारचे उपचार करायचे किंवा उपचार बंद करायचे, हे आता आपण ठरवू शकतो, असे प्रतिपादन डॉ. संदेश चोडणकर यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 2024 च्या समितीच्या स्थापना कार्यक्रमात ते बोलत होते.
आजच्या कार्यक्रमात मानसिक आरोग्यासाठी गोव्याला आदर्श राज्य बनवणे (Goa as a model State for Mental Health) आणि इच्छामरण (End of Life Care) या दोन महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती सांगताना डॉ. शेखर साळकर म्हणाले की, असे अनेक रुग्ण असतात जे जीवघेण्या आजाराने त्रस्त असतात. जे फक्त वैद्यकीय आधारावर जिवंत असतात. तसेच काहींवर कोणत्याही उपचाराचा कोणताच परिणाम होत नाही. त्यांना आता इच्छामरण स्वीकारता येणार आहे.
अशांना उपचार सुरू ठेवायचे का? कोणत्या पद्धतीचे उपचार करायचे? की सुरू असलेले उपचार बंद करायचे आणि मृत्यू स्वीकारायचा हा निर्णय आता घेता येणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात मंजूरी दिली आहे.
तसेच जर कुणी याबाबत निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसेल तर ते आपल्या परिवारापैकी एकाची नेमणूक करू शकतात. जे त्यांच्या मृत्यूचा निर्णय घेऊ शकतील.
डॉ. साळकर पुढे म्हणाले की, याबाबत संबंधित डॉक्टर गोवा सरकारची भेट घेऊन नियमावली ठरवणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला कसा मृत्यू हवा हे ठरवता येणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.