Goa Crime Case: Dainik Gomantak
गोवा

सासूनं फोडलं मांजरीचं डोकं, सूनेनं दाखलं केली तक्रार; फोंड्यातील घटनेची राज्यात चर्चा

Goa Crime Case: पाळीव प्राण्यांवरील अत्याचाराचा नवीन प्रकरण; सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: काही दिवसांपूर्वी कोलवा येथे एका पाळीव कुत्र्याच्या अंगावर उकळते गरम पाणी ओतल्याची घटना घडली होती. या अमानुष कृत्य करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध प्राणी मित्रांसह समाजमाध्यमांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या.

याच घटनेसारखे दुसरे प्रकरण फोंडा तालुक्यात घडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार घरगुती भांडणातून एका पाळीव मांजरीला गंभीर दुखापत करण्यात आलीय.

घरातील पर्शियन जातीच्या पाळीव मांजरीच्या डोक्याला तसेच तोंडाला दुखापत केल्याची तक्रार सिल्वा नगर येथे राहणाऱ्या अल्फिया रेगो यांनी आपल्या सासू (रोझी रेगो) विरोधात फोंडा पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

घरातील भांडणाचा राग सासूने मांजरीवर काढला असून तिला अकारण मारहाणकेली असून तिच्यावर कडक कारवाई करावी, असे या तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीची दखल घेऊन फोंडा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भट यांनी सासूच्या विरोधात ‘प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा १९६०’ अंतर्गत सासू रोझी हिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT