Lakshadweep Maldives Row: लक्षद्वीप - मालदीव वादात गोवा आणि कोकण चर्चेत; एक्सवर ट्विट्सचा पाऊस

लक्षद्वीप भेटीचे मोदींनी फोटो शेअर केल्यानंतर मालदीवच्या काही नेत्यांनी मोदी आणि भारताबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली.
Lakshadweep Maldives Row
Lakshadweep Maldives Row

Lakshadweep Maldives Row: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला भेट दिली. मोदींनी लक्षद्वीपच्या नैसर्गिक सौंदर्य आणि येथील लोकांचे कौतुक केले. लक्षद्वीप भेटीचे मोदींनी फोटो शेअर केल्यानंतर मालदीवच्या काही नेत्यांनी मोदी आणि भारताबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली.

यावरुन अलिकडे निर्माण झालेल्या वादात बायकॉट मालदीव ट्रेन्ड सुरु झाला तसेच, भारतातील लोक विविध देशी पर्यटनस्थळे आणि बीचबाबत माहिती शेअर करु लागले. यात गोवा आणि कोकणातील बीच सध्या ट्रेन्ड होत आहेत.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेकांनी गोवा आणि कोकणातील बीचचे फोटो शेअर केले आहेत. गोवा आणि अंदमान निकोबार येथे नयनरम्य बीच असताना मालदीवला कशाला जायचं? असे एका युझरने ट्विट केले आहे. ट्विटसोबत त्याने बायकॉट मालदीव हा हॅशटॅग वापरला आहे.

आणखी एका युझरने आपल्याकडे गोवा असताना मालदीवला का जायचं असा प्रश्न उपस्थित करत गोव्यातील फोटो शेअर केले आहेत.

याच वादात एका युझरने मीम शेअऱ केले असून, यात माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर दिसत असून त्याला मालदीव का लक्षद्विप असा प्रश्न विचारला तर गंभीर बायणा, गोवा असे उत्तर देतो.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील बीचचे फोटो शेअर केले आहेत. मालदीव नव्हे हे महाराष्ट्राला लाभलेले सुंदर कोकण आहे. असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

ट्विटरवर अनेकांनी गोव्यातील बीचचे फोटो शेअर करत भारतातील बीचला भेट देण्याचे आवाहन केले.

भारतातील बीच सुंदर आहेत, आपण देशातील बीच सौंदर्य अनुभवले पाहिजे असे ट्विट एका युझरने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com