'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Goa News: जस्ट ट्रान्झिशन कार्यशाळेत सहभागी मान्यवरांसोबत खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते.
Just Transition Workshop
जस्ट ट्रान्झिशन कार्यशाळेत सहभागी मान्यवरांसोबत खासदार सदानंद शेट तानावडे, मिचिको मियामोतो, डॉ. धीरेंद्र कट्टी, प्रा. प्रदीप स्वर्णकार, सकाळ मीडिया ग्रुपचे सीईओ उदय जाधव, दीबदीप दे, डॉ. प्रिथा सरकार आणि इतर मान्यवरSandip Desai
Published on
Updated on

पणजी: भविष्य कसे असेल, याचा अंदाज लावणे अधिक कठीण आहे; परंतु ते चांगले करण्यासाठी योग्य नियोजन करत पावले उचलावी लागतील. शाश्वत विकास ही काळाची गरज असून रोजगार निर्मितीमध्ये करोडो भारतीयांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यात कौशल्याधारित हरित रोजगार महत्त्वाची भूमिका निभावेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो यांनी केले.

जस्ट ट्रान्झिशन नॉलेज नेटवर्क, आयआयटी कानपूर आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जस्ट ट्रान्झिशन डायलॉग मॅपिंग स्किल इकोसिस्टम कार्यशाळेच्या उदघाटनसमयी विशेष अतिथी म्हणून बोलत होत्या.

Just Transition Workshop
Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना, भारत मुख्यालयाचे प्रमुख संजय अवस्थी, आयआयटी गोवाचे संचालक धीरेंद्र कट्टी, जस्ट ट्रान्झिशन संशोधन संस्थापक प्रदीप स्वर्णकार, केंद्राचे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे संशोधन प्रमुख दीबदीप दे, डॉ. प्रिथा सरकार आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी 'शाश्वततेसाठी कौशल्य अहवालाच प्रकाशन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com