Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Women Children Safety In Goa: कायद्याचे उल्लंघन केल्यास संबधित हॉटेल, गेस्टहाऊसचे मालक आणि मॅनेजर यांना जबाबदार धरले जाणार.
Women Children Safety In Goa
Goa Tourism
Published on
Updated on

पणजी: महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्या, तसेच काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल याची खातरजमा करा, अशी सक्त सूचना पर्यटन विभागाने राज्यातील सर्व हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि होमस्टे चालकांना दिल्या आहेत. लहान मुलांविरोधात वाढत्या अत्याचाराच्या घटना विचारात घेता विभागाने ही सूचना जारी केली आहे.

कुटुंबीय किंवा नातेवाईक सोबत असल्याशिवाय लहान मुलांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये, असेही विभागाने बजावले आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटक आणि पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे याची खबरदारी विभागाच्या वतीने घेतली जात आहे.

पर्यटन क्षेत्रात असलेल्या सर्वांनी राज्यातील महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची काळजी घ्यावी. यात अजिबात हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशी सक्त सूचना पर्यटन विभागाचे संचालक केदार नाईक यांनी दिल्या आहेत.

Women Children Safety In Goa
PAN PAN PAN: 191 प्रवाशांना घेऊन गोव्याला निघालेल्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड येताच ओरडला पायलट, मुंबईत केलं इमर्जन्सी लँडिंग

हॉटेल किंवा लॉजिंग व बोर्डिंग सुविधा देणाऱ्या अस्थापनांमध्ये लहान मुलांना कोणत्याही प्रकारचा अत्याचार आणि छळवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी तरतूद गोवा बाल कायदा २००३ च्या कलम ८ (१०) अंतर्गत करण्यात आली आहे.

या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबधित हॉटेल, गेस्टहाऊसचे मालक आणि मॅनेजर यांना जबाबदार धरले जाईल, तसेच यासाठी त्यांना एक लाख रुपये दंड आणि तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.

कामाच्या ठिकाणी महिलांवरील अत्याचार आणि छळ बाबत असलेला पॉश कायदा (२०१३) चे देखील पालन करावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. गोव्यात हॉटेल, लॉजिंग व बोर्डिग सुविधा पुरवणाऱ्या सर्व अस्थापनांनी या नियमांचे पालन करावे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com