Amit patkr dainik gomantak
गोवा

Goa Congress: प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी अमित पाटकर

Goa Congress: दोन आठवड्यापूर्वी गोवा कॉंग्रेसच्या प्रभारीपदी माणिकराव ठाकरेंची नियुक्ती करण्यात आली

Ganeshprasad Gogate

Goa Congress: सध्या सर्वच पक्ष 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोर्चेबांधणी करत आहेत. पक्षात आवश्यक ते बदल घडवत आहेत. निवडणुकीत जिंकून सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांकडे जाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

गोवा प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांची नियुक्ती करण्यात आलीय. या नियुक्तीचा आदेश दिल्लीतून जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच समितीच्या सदस्यांत युरी आलेमांव, गिरीश चोडणकर, फ्रांसीस सार्दीन, रमाकांत खलप, एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा, एम.के शेख, डॉ. प्रमोद साळगांवकर, शंभू बांदेकर यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

दोन आठवड्यापूर्वी गोवा कॉंग्रेसच्या प्रभारीपदी माणिकराव ठाकरेंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांच्याकडे त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर आणि नागालॅण्ड या चार राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर गोवा प्रमुख माणिकराव ठाकरे यांनी लोकसभा 2024 निवडणुका आणि 2027 मधील विधानसभा निवडणुकीतही पक्ष जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT