50.90 लाखांच्या ड्रग्ज प्रकरणी नायजेरियन नागरिक इफेचूक्वू डॅव्हिड माडूक्वेला याला म्हापसा जिल्हा न्यायालयाने दणका दिला. न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली. डिसेंबर 2019 मध्ये कोरगाव येथे पेडणे पोलिसांनी त्याला अटक केली होती.
नक्षा उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन. या उपक्रमांतर्गत सरकार पंचायत आणि पालिका क्षेत्रात करणार जीआयएस मॅपींग. टीसीपी परवाने घेऊन बांधकाम आरखाड्यानुसार आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार. आरखाड्यानुसार बांदकाम नसल्यार होणार कारवाई: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोव्यातील रमा पेडणेकर (कुडचडे, ६०) यांचे प्रयागराज येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोवा सरकारने आयोजित केलेल्या विशेष ट्रेनमधून ते प्रयागराजला गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा मोठ्या गर्दीत हरवला आणि त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकला नाही, ज्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तो चिंताग्रस्त झाला होता.
अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोन गोवावासीयांची 18.5 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी एका एजंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितांना बेकायदेशीरपणे मेक्सिको मार्गे पाठवले गेले होते परंतु त्यांना पकडले गेले आणि त्यांना निर्वासित केले गेले. याचा तपास अद्याप चालू आहे.
अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांमुळे अपघात तसेच आपत्कालिन स्थितीत अग्नीशमन दलाचे वाहन पोहोचणे अशक्य होते. जीआयएस सर्वेक्षणामुळे अतिक्रमणे शोधून त्याविरोधात कारवाई करण्यात येणार. तत्पूर्वी, सर्वेक्षणाला गोमंतकीयांनी विरोध करु नये, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
वाळपईतील छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानात पंच धातूचा महाराजांचा नवीन पुतळा. शिवजयंतीच्या मुहूर्तावर होणार मंत्री विश्वजित राणेंच्या हस्ते अनावरण.
बोडगेश्वर देवस्थानच्या नवनिर्वाचित व्यवस्थापकीय समितीने आव्हान दिलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रशासकीय लवादाने शपथविधीला दिलेली स्थगिती आज रद्दबातल ठरवली. त्यामुळे नवीन समितीचा मार्ग मोकळा झाला आहे. माहिती देताना ॲड. अभिजीत गोसावी.
वडील स्वतंत्र सैनिक होते म्हणून आज आम्हाला सरकारी नोकरी मिळाली; हे स्वतंत्र सैनिकांच्या मुलांनी लक्षात ठेवणे गरजेचे. मुख्यमंत्री, प्रमोद सावंत
तुये-पेडणे येथील पेट्रोल पंपाजवळ चारचाकी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाल्याची नोंद. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
हुतात्मा बाळा राया मापारी यांचे कायमस्वरूपी स्मारक. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची घोषणा.
गोवा मुक्तीलढ्यातील पहिले हुतात्मा बाळा राया मापारी यांना अभिवादन. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री सुभाष शिरोडकर आणि निळकंठ हळर्णकर यांनी अस्नोडा येथील स्मारकावर अर्पण केली पुष्पांजली. पुण्यतिथीनिमित्त बलिदान दिवस साजरा.
मांद्रेचे माजी सरपंच व पंचायत सदस्य प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी मांद्रे मतदारसंघातील विविध भागातील लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांच्या समाजसेवी भावनेमुळे मतदारसंघातील लोक त्यांच्याकडे जोडले गेले असून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्शील असल्याचे प्रशांत नाईक यांचे लोकांना आश्वासन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.