आम्ही हाक मारली तर १०,००० कर्मचारी आमच्या पाठीशी उभे राहू शकतात आणि एका हाकेला ते येणार. आमच्याकडे संघटनेचे भक्कम मनुष्यबळ आहे. तसेच संघटनेच्या नेतृत्वाखाली संघटित संघर्षाची तयारी देखील आहे. सेवा मुदतवाढीच्या मुद्द्यावर संघटना शांत बसणार नाही. आम्ही योग्य वेळी रस्त्यावर उतरू. सरकारला वेळोवेळी आम्ही हे कळवले आहे. मात्र ज्यांच्यावर अन्याय होतो ते आवाज उठवत नाहीत, ही परिस्थिती बदलली पाहिजे, असे मांद्रेकर म्हणाले.
माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर, शशिकलाताई काकोडकर आणि मगोपवर टीका करणाऱ्या माजी आमदार उदय भेंब्रे यांचा मगोपच्यावतीने जाहीर निषेध. बहुजन मागे पडण्याचे कारण भेंब्रेसारख्यांनी पोर्तुगीजांशी हात मिळवणी केल्यानेच, असा आरोप मगोप नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.
बार्देश बाजाराच्या अध्यक्षपदावरून वाद पेटला असून, ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष धर्मा चोडणकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष निखिलचंद्र रमाकांत खलप यांच्या निवडीला बेकायदेशीर ठरवले आहे. चोडणकर यांनी खलप यांच्यावर भागधारक, संचालक आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.
खलप यांनी चोडणकर यांच्यावर पलटवार करत त्यांची संकुचित मानसिकता बाजाराच्या प्रगतीस अडथळा ठरत असल्याचे म्हटले. तसेच, नव्याने निवडणूक घ्यायची असल्यास, आधी चोडणकर गटाच्या सहा संचालकांनी राजीनामा द्यावा, असा प्रस्ताव दिला.
मोहन गावकर यांची गोवा विधानसभेच्या संयुक्त सचीवपदी बढती. गावकर हे मूळ पोडोशे ह्या सत्तरीतील दुर्गम भागातील रहिवासी. हल्लीच सत्तरीचे सुपुत्र डॉ. सुंदर धुरी यांची गोवा विद्यापिठाच्या रजिस्ट्रारपदी झाली होती नेमणूक.
१२ लाखांपर्यंत कमावणाऱ्या व्यक्तींसाठी आयकर सवलतीची घोषणा हे मध्यमवर्गाच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक परिवर्तनकारी पाऊल आहे. या निर्णयामुळे राष्ट्र उभारणीत मोठ्या प्रमाणात बचत आणि गुंतवणुकीला चालना देऊन अत्यंत आवश्यक आर्थिक दिलासाही दिला गेला असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.
डिचोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलवर कार आणि स्कूटरमध्ये भीषण अपघात घडला. सुदैवाने यात स्कुटरचालक युवकासह महिला सुखरूप बचावले.
गणेश जयंती उत्सवानिमित्त साखळीतील श्री सिध्दीविनायक मंदिरात लोकांची दर्शनासाठी गर्दी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रींचे दर्शन घेत गोमंतकीयांना दिल्या गणेश जयंतीच्या शुभेच्छा.
नवीन अर्थसंकल्पानुसार १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त झाले असून, १८ लाखांवर ३० टक्क्यांचा कर लागू होईल .
भारताच्या सागरी संसाधनांचे संरक्षण आणि विकास करण्यासाठी, विशेषत: अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांच्या आसपास, रोजगार निर्माण करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार एक योजना तयार करेल.
केंद्र सरकार राज्यांच्या मदतीने पंतप्रधान धनधान्य कृषी योजना हाती घेणार आहे. या योजनेतून १.७ कोटी शेतकऱ्यांना ग्रामीण समृद्धी निर्माण करण्यासाठी मदत केली जाईल. या योजनेत ग्रामीण महिला, तरुण शेतकरी,अल्पभूधारक आणि भूमिहीन कुटुंबांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
ओपा बायपास रोड येथे अपघाताची नोंद झाली आहे. दुचाकीस्वार जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सरकारी नोकऱ्यांमध्ये अधिकृत 'सह राज्यभाषा' मराठीला डावलून गोवा सरकारने केलेल्या राजभाषा कायदा उल्लंघनाचा तीव्र निषेध. गोमंतकीय हे कदापी सहन करणार नाहीत. ही आंदोलनासाठी चिथावणी ठरेल : प्रा. सुभाष वेलिंगकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.