B.L.Santosh Dainik Gomantak
गोवा

Goa News: बी.एल.संतोष यांनी मंत्र्यांसह आमदारांची घेतली भेट; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Today's Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी. गोव्यातील राजकारण, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Panditrao

Goa Politics: बी.एल.संतोष यांनी मंत्र्यांसह आमदारांची घेतली भेट

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस संघटन बी.एल.संतोश यांची मंत्री विश्वजीत राणे, मंत्री अलेक्स सिक्वेरा, अपक्ष आमदार डॉ.चंद्रकांत शेट्ये, खासदार तानावडेंनी घेतली भेट. आणखीनही नेते भेटणार.

दाबोळीत बॅरिकेड्स कोसळून एकाचा मृत्यू

दाबोळी येथील विशाल मेगा मार्ट जवळ रस्त्याच्या कडेला असलेला बॅरिकेड्स कोसळल्याने विद्युत विभाग कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सहकारी आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संबंधितांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरण्याची मागणी होत आहे.

Goa Cabinet: मंत्रिमंडळ फेरबदलावर बी.एल.संतोष यांचे मौन!

मंत्रिमंडळ फेरबदलावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस संघटन बी.एल.संतोष यांचे मौन. बांदोड्यात महालक्ष्मी देवस्थानाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत बी.एल.संतोष यांनी घेतला अखिल भारतीय महिला समन्वय बैठकीच्या तयारीचा आढावा. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे व पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची होती उपस्थिती.

मयेच्या माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला प्रारंभ!

मयेच्या माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला प्रारंभ. पोलिस बंदोबस्तात गावकरवाडा येथील महामाया मंदिरातून देवीचा कळस काढला बाहेर.

 अखेर घोटाळेबाज मायरॉन रॉड्रिग्सच्या पत्नीला अटक

कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने दीपाली परब (42, रा. कल्याण, मुंबई) हिला अटक केली. ती घोटाळ्यातील मुख्य आरोपी मायरॉन रॉड्रिग्जची पत्नी आहे.

मयेत माया केळबाय कळसोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त

मयेत माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात. देवीचा कळस अजूनही मंदिरात.

NESSAI IDC: नेसाई आयडीसीमध्ये पाणी आणि वीजपुरवठा खंडित, सासष्टीच्या मामलेदारांनी दिली यार्ड बंद करण्याची तंबी

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनंतर सासष्टीचे मामलेतदारासह संबंधित अधिकाऱ्यांनी नेसाई आयडीसी येथील दोन भंगार यार्डची तपासणी केली. मामलतदारांनी यावेळी यार्डच्या लोकांना कचरा साफ करण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत पाणी आणि वीजपुरवठा खंडित करावा लागला आहे. तीन दिवसांनंतर दोन्ही भंगार यार्ड सील केले जातील.

गोवा टीव्ही केबल आणि सेवा पुरवठादार संघटनेच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी

गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयात सर्व गोवा टीव्ही केबल आणि सेवा पुरवठादार संघटनेच्या याचिकेवर उद्या म्हणजेच बुधवारी (5 मार्च) तर सर्व गोवा इंटरनेट सेवा पुरवठादार संघटनेच्या याचिकेवर 11 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांना थकबाकीच्या 20 टक्के रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले आहे.

Goa Accident: फोंड्यातून उसगांवकडे जाताना दुचाकीस्वाराचा अपघात; कंत्राटदाराचा जागीच मृत्यू

फोंड्यातून उसगांव दिशेने जात असता रस्त्याच्या डिवायडरला दुचाकी धडकल्याने पेंटींग कंत्राटदार चंद किशोर (वय 55) यांचा मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

B L Santosh Goa Visit: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल.संतोष गोव्यात दाखल!

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल.संतोष गोव्यात दाखल. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले स्वागत.

Revora: रेवोडो येथील नदीत आढळला 70 वर्षीय वृद्धाचा मृतदेह

रेवोडो येथे ७० वर्षीय देवानंद शिंदे यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. म्हापसा पोलिसांचा तपास सुरू आहे.

Goa Crime: विवाह नोंदणीसाठी बनावट रहिवाशी दाखला; दोघांना अटक

विवाह नोंदणीसाठी बनावट रहिवाशी दाखला सादर केल्या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी गेरार्ड जूड वेटमेन याला बंगळुरू येथे ताब्यात घेऊन नंतर अटक केली तर याच प्रकरणात त्याचा साथीदार जो डिसोझा याला राय येथे अटक केली.

भविष्यात जीएचआरडिसीच्या सेवाकर्त्यांना गृहकर्ज व बोनस देण्याचा विचार, मुख्यमंत्र्यांकडून घोषणांची खैरात

भविष्यात गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सरकार बोनस व गृहकर्ज देण्याच्या विचारात आहे. हा कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या पातळीवर आणण्याचा विचार आहे. यापुढे या त्यांच्या पगारातील सेवाकर सरकार भरणार. सर्वात उशीरा स्थापन होऊन सर्वात प्रथम स्वावलंबी होणारे हे एकमेव महामंडळ. मुख्यमंत्र्यांकडून जीएचआरडीसीच्या कामगारांना घोषणांची खैरात.

Borim Fire Incident: देउलवाडा बोरी येथे सोन्याच्या दागिनेच्या दुकानाला आग

देउलवाडा बोरी येथे गजंतलक्ष्मी या सोन्याच्या दागिन्याच्या दुकानाला आग. दुकान मालक संकेत कारेकर जखमी. या दुर्घटनेत एसी जाळून खाक. जखमी उपजिल्हा हॉस्पिटल मध्ये दाखल.फोंडा अग्निशमन दलाचे अधिकारी सुशील मोरजकर व कर्मचाऱ्यांनी आग विझविली.

GMC Bambolim: ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जीएमसी’त विशेष काऊंटर

बांबोळी येथील जीएमसीत ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या अडचणी व त्रास यावर उपाय म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र काऊंटर उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी दिली.

Panaji Accident: पणजीत क्रेन आणि कदंब ईव्ही बसमध्ये अपघात

पणजीतील जुने सचिवालय येथे क्रेन आणि कदंब ईव्ही बसमध्ये अपघात झाला. सुदैवाने बस रिकामी होती त्यामुळे कोणी जखमी झाले नाही.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याच्या सुचना!

महाराष्ट्र सरकारातील मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची सुचना. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT