Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa News: थिवीत भीषण अपघात, बाईकस्वार गंभीर जखमी; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: वाचा गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या बातम्या

Manish Jadhav

थिवीत भीषण अपघात, बाईकस्वार गंभीर जखमी

थिवी येथे झालेल्या भीषण अपघातात एक बाईकस्वार गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, थिवी मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात बाईकस्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. अपघाताची नोंद स्थानिक पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

Anjunem Dam: अंजुणे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा जलसंपदा विभागाने घेतला निर्णय VIDEO

अंजुणे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे जलसंपदा विभागाने मोठा निर्णय घेतला. धरणाच्या गेट क्रमांक 3 मधून 2 सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि धरणाच्या सुरक्षिततेसाठी हा विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले.

धारबांदोडा झेडपीत रोमांच! निलेश मापारींनी भरला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज

निलेश मापारी यांनी धारबांदोडा जिल्हा पंचायत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे मापारी यांनी सांगितले.

‘युनिटी मॉल’ला आव्हान देणारी याचिका गोवा खंडपीठाने काढली निकाली!

चिंबल येथील प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ प्रकल्पाच्या बांधकाम परवान्यासंबंधीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निकाली काढली. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेत या आदेशाला पंचायत उपसंचालकांकडे आव्हान देण्याचे मान्य केले. यापूर्वी, चिंबल ग्रामसभेने मॉलला विरोध करणारा ठराव मंजूर केल्यानंतर पंचायतीने गोवा पर्यटन विकास महामंडळ ‘जीटीडीसी’चा बांधकाम परवाना अर्ज फेटाळला होता.

मटकाप्रकरणी एकाला मडगावात अटक, पुढील तपास सुरु

मडगाव पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई करताना एकाला अटक केली. प्रशांत बादी (49) असे संशयिताचे नाव असून मागाहून त्याला जामिनावर सोडले. येथील न्यू मार्केटजवळ संशयित मटका घेत होता. पोलिसांनी त्याच्याकडील मटका साहित्य व 740 रुपये जप्त केले. साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उमेश गावडे पुढील तपास करीत आहे.

भाजपला मोठा धक्का! बाबू आजगावकर यांचा तोरसे झेडपी निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी भाजप (BJP) पक्षाच्या तोरसे जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. या नाराजीमुळे आजगावकर यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बाजारात पार्क केलेल्या टेम्पोत आढळला 55 वर्षीय महिलेचा मृतदेह; खुनाचा संशय, पोलिस, फॉरेन्सिक पथक दाखल

Canacona Beach: पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे! नोंदणी नसलेले वॉटर स्पोर्ट्स अन् डॉल्फिन राईड्सचा काणकोणात हैदोस; माफीयांचे वाढले वर्चस्व

Goa Today Live Updates: घर रिकामे करण्याच्या नोटीसची गोवा मानवाधिकार आयोगाकडून दखल; सुकूर पंचायतीच्या सचिवांना समन्स

AFC Champions League 2: एफसी गोवाचा कडू शेवट! 2025 चे मैदान पराभवाने गाजले; आता भारतीय फुटबॉलचे भविष्यही अधांतरी

Vasco Market: मुरगाव पालिकेच्या नियमांना हरताळ, वास्को मार्केट बनलं 'अडथळ्यांचं आगर'; कारवाईच्या इशाऱ्यानंतरही विक्रेत्यांची दादागिरी सुरुच

SCROLL FOR NEXT