Goa Live Updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: रामा कानकोणकर हल्ला प्रकरण; झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी, राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर.

Sameer Amunekar

GST New Rate: आजपासून जीएसटीचे नवे दर लागू

‘जीएसटी’चे टप्पे चारवरून दोनपर्यंत कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची आजपासून (ता. २२) अंमलबजावणी सुरू होत असून यामुळे दैनंदिन गरजेच्या असंख्य वस्तू स्वस्त होणार आहेत.

Truck Battery Thefts: सावर्डे - धडे येथे ट्रकच्या बॅटरीची चोरी

सावर्डे-धडे परिसरात ट्रक बॅटरी चोरीचा प्रकार पुन्हा घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातून आणखी एका ट्रकची बॅटरी चोरी झाली आहे. यापूर्वीच कुडचडे पोलिस ठाण्यात ११ ट्रक बॅटरी चोरीच्या तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत.

'प्रशासन स्तंभ' आणि 'युनिटी मॉल' हे सरकारी जमिनीवर बांधले जात आहेत

'प्रशासन स्तंभ' आणि 'युनिटी मॉल' हे सरकारी जमिनीवर बांधले जात आहेत. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी प्रथम त्याची व्याप्ती आणि फायदे समजून घ्यावेत. या प्रकल्पामुळे हजारो लोकांना रोजगार मिळेल, स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

१५ वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली सर्व सरकारी वाहने रद्द

१५ वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली सर्व सरकारी वाहने रद्द केली जातील: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

ओंकार हत्तीचे सुरक्षित स्थलांतर करणार : मुख्यमंत्री

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा सरकारमध्ये समन्वय सुरू आहे. वन विभाग सक्रियपणे काम करत आहे. ओंकार हत्तीचे सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. हत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देखील दिली जाईल : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळी उपनगराध्यक्षपदी दयानंद बोर्येकर यांची निवड निश्चित

साखळी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक दयानंद बोर्येकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली आहे. उद्या २३ सप्टेंबर रोजी सकाळी होणार निवडणूक प्रक्रिया.

माजोर्डा येथे बैलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, चार जखमी

माजोर्डा येथे बैलाच्या हल्ल्यात राजेश निस्तानी यांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा धीरियो असल्याचा संशय आहे. कोलवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

बेकायदेशीर लॅटराइट दगड खाणीवर छापा; ३८ लाख किमतीची यंत्रसामग्री जप्त

खाण विभागाने सत्तारी येथील मालपण येथील बेकायदेशीर लॅटराइट दगड खाणीवर छापा टाकला आणि ३८ लाख किमतीची यंत्रसामग्री जप्त केली. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की ही खाण आवश्यक परवानग्यांशिवाय चालवली जात होती. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

आमदार वेंझी व्हिएगास यांनी तीन दिवसांत जाहीरपणे माफी मागितली नाही तर आम्ही कारवाई करू

जर आपचे आमदार वेंझी व्हिएगास यांनी तीन दिवसांत जाहीरपणे माफी मागितली नाही तर आम्ही योग्य वाटेल ती कारवाई करू. वेंझी हे उघड धमकी मानत असले तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही:भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तुषार केळकर

तांबोसे येथे शेताच्या मळ्यात सलग पाच दिवस ओंकार हत्तीने ठाण मांडून

तांबोसे येथे शेताच्या मळ्यात सलग पाच दिवस ओंकार हत्तीने ठाण मांडून राहिल्यामुळे तो हत्ती कुठे लपून राहतो? याचा पत्ता लागत नसल्याने वन खात्याने सध्या जे मोठे ताण गवत उभे राहिले होते. ते कट करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे

रामा कानकोणकर हल्ला प्रकरण; झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी

पणजी जेएमएफसीने सामाजिक कार्यकर्त्या रामा कानकोणकर हल्ला प्रकरणातील आरोपी झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ujjwala Scheme: 25 लाख महिलांना मिळणार मोफत एलपीजी कनेक्शन, 'उज्ज्वला' योजनेचा केला विस्तार; महिला सबलीकरणासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल

Navratri Day 2: दीर्घायुष्य आणि यश हवे असल्यास करा ब्रह्मचारिणीची पूजा; नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा शुभ रंग जाणून घ्या!

Navratri in Goa: ना गरबा, ना दुर्गापूजा; नऊ प्रकारच्या धान्यांची पेरणी आणि मखरोत्सव; गोव्यातील नवरात्रीचं वेगळेपण काय?

IND vs PAK: 'सूर्या ब्रिगेड'चा विजयाचा नवा अध्याय! टीम इंडियानं केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, आता पाकिस्तानविरुद्ध रचणार इतिहास

कोणाचीही गय नाही! रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाच्या मुळाशी जाणार; मुख्यमंत्री सावंतांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT