गोवा मंत्रिमंडळाने राज्य वारसा धोरणाला मान्यता दिली धोरणाची तपशीलवार माहिती आणि अंमलबजावणीची माहिती देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी पुरातत्व मंत्र्यांना दिले आहे.
म्हार्दोळ पोलिसांनी खांडोळा येथे १२९ ग्राम गांजा बाळगल्या प्रकरणी रितुराज रुहीत छेत्री (२२, पणजी ) याला केली अटक. १२, ९०० रुपये किंमतीचा गांजा व स्कुटर जप्त.
केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी भेट घेतली. दरम्यान त्यांनी गोव्याच्या पर्यटन परिसंस्थेमध्ये कॉन्सर्ट इकॉनॉमीच्या आमच्या उपक्रमाला उत्साह आणि पाठिंबा दर्शविला. या उपक्रमात शाश्वत आणि पुनरुत्पादक पर्यटन उद्दिष्टांद्वारे चालणाऱ्या आणि गोव्याच्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदीजींच्या एमआयसीई टुरिझमच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असे आयकॉनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे.
सत्तरी आणि सांगे ह्या गोव्यातील ग्रामीण भागात मोबाईल रेंजची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाचा महत्वाचा निर्णय. वाघेरी, सत्तरीत फोर जी मोबाईल टॉवरसाठी 200 चौरस मीटर जमीन देण्यास मंजूरी. वाडे,सांगेतही मोबाईल टॉवरसाठी अतिरिक्त सरकारी जमीन देण्यास मंजूरी. मांद्रे पंचायतीला स्मशानभूमी आणि इतर प्रकल्पांसाठी 2 हजार चौरस मीटर सरकारी जमीन देण्यास मंत्रीमंडळाची मंत्रीमंडळाची मंजूरी.
एका लाईनमनला वीज लागून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्य विद्युत अभियंत्याकडे अहवाल सादर केला आहे.वीज विभागाच्या लाईनमनची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सरकार गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने डिझाइन केलेले आणि विकसित केलेले 100 स्मार्ट हेल्मेट आणि घड्याळ यासह सुरक्षा उपकरणे खरेदी करेल. असे ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
- 22 जूलैपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार.
- गोवा राज्य हॅरीटेज पॉलिसीला मंत्रीमंडळाची मान्यता.
- चिंबल येथील युनीटी मॉलची निविदा जारी
- वाघेरी, सत्तरीत मोबायल टॉवरसाठी 200 स्क्वेअर मीटर सरकारी जमीन मंजूर
- सांगेत मोबाईल टॉवरसाठी सरकारी जमीन देण्यास मंजुरी
भाटले- पणजी येथे राम मंदिराजवळ पाण्याची पाइपलाइन फुटली. या परिसरात कालपासून पाणी पुरवठा खंडित.
कवळे पंचायतीकडून ढवळी बायपास येथील बेकायदेशीर स्क्रेप अड्ड्यांची पाहणी. सर्व अड्डे बेकायदेशीर असून उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार या अड्ड्यांवर कारवाई करण्यात येईल, सरपंच मनुजा नाईक यांची माहिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा मजबूत पाया घातला असून, गेल्या ११ वर्षांतील कामगिरीमुळे भारत आज अधिक सुरक्षित आणि सक्षम बनला आहे, असे मत पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी व्यक्त केले.
बिर्याणीचे पैसे मागितल्याबद्दल ८ जून रोजी दोन जणांनी रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर कळंगुट पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
कळंगुटमध्ये एका रेस्टोरंटात बिर्याणी खाऊन पैसे न देता वेटरला गुंडांकडून बेदम मारहाण. घटनेला ६० तास उलटून, सीसीटीव्ही गुंडांचा चेहरा स्पष्ट दिसतानाही पोलिसांच्या हाती अजून कोणीच लागलेले नाहीत. कॉंग्रेसकडून सरकारचा निषेध.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.