Short Circuit Dainik Gomantak
गोवा

Goa News: शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 10 हजारांचे नुकसान; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक आणि ताज्या घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या बातम्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

केबल जळाल्याने वीज खंडित

भाटले, पणजी येथील श्री सटी भवानी मंदीर परिसरात वीज केबल जळाल्याने काल रात्री ९.३० वाजल्यापासून वीज खंडित. स्थानिकांची गैरसोय. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम अद्याप सुरूच

मत्स्यव्यवसाय विभाग गप्प कसा बसू शकतो?

आरजीपीने करंजाळे बीचवरील 'ओशनमॅन' क्रीडा स्पर्धेविरुद्ध कारवाईची मागणी करणारे निवेदन मत्स्यव्यवसाय विभागाला सादर करण्याची घोषणा केली आहे. हे ठिकाण मासेमारीसाठी आहे, मत्स्यव्यवसाय विभाग गप्प कसा बसू शकतो? स्थानिक मच्छिमारांना पक्षाचा "पूर्ण पाठिंबा": आमदार विरेश बोरकर

ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांचे व्हाळशी-डिचोली येथील राहत्या घरात निधन

ज्येष्ठ पत्रकार तथा दै.'नवप्रभा'चे माजी संपादक सुरेश वाळवे यांचे निधन. व्हाळशी-डिचोली येथील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास. कर्करोगाशी त्यांची झुंज चालू होती.

मांद्रे येथील श्रीदेवी भगवती सप्तेश्वर कार्तिकी एकादशी सप्ताहाला सुरुवात

मांद्रे येथील श्रीदेवी भगवती सप्तेश्वर कार्तिकी एकादशी सप्ताहाला सुरुवात झाली असून, मुख्य सप्ताह एक नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. त्या अगोदर सात दिवस वेगवेगळे पारकरी मंडळ आपल्या भजनाचा कार्यक्रम श्रीदेवी भगवती मंदिराच्या प्रांगणात सादर करतात

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 10 हजारांचे नुकसान

पाटो-पणजी येथील ईडीसी कॉम्प्लेक्समधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीने मुख्य दरवाजाने पेट घेतला. त्यामुळे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली. आग प्रामुख्याने प्रवेशद्वाराजवळील भागापुरतीच मर्यादित होती.

"वीजदर कमी करा, नाहीतर निदर्शने करू"- अमित पालेकर

आप गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी सरकारने अलीकडील वीज दरवाढ मागे घेण्याची आणि स्मार्ट मीटर बसवणे थांबवण्याची मागणी केली आहे. कारण वाढीव शुल्काचा फटका मध्यमवर्गाला सहन करावा लागेल. या चिंता दूर करण्यात अयशस्वी झाल्यास निदर्शने होऊ शकतात असा इशारा त्यांनी दिला.

सावर्डेवासियांची वाळपई पाणी पुरवठा खात्यावर धडक

गेल्या आठ दिवसापासून नळ कोरडे, एन दिवाळीत नागरिकांचे हाल, वेळीच पाणी पुरवठा सुरळीत न केल्या मोर्चा आणण्याचा नागरिकांचा इशारा. तीन महिनापासुन गढूळ पाण्याचा प्रश्न संपुष्ठात आल्यानंतर आता नळाला पाणीच नसल्याचा नागरिकांचा आरोप.

हिट अँड रन अपघातात एकाचा मृत्यू

फतोर्डा येथे हिट अँड रन अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाजवळ घडली. पारोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

बेकायदेशीरपणे चिखल टाकणाऱ्या ट्रकना ग्रामस्थांनी रोखलं

पंचायत, सरपंच किंवा जमीन मालकांच्या परवानगीशिवाय शेतात बेकायदेशीरपणे चिखल टाकणाऱ्या ट्रकना ग्रामस्थांनी रोखल्यानंतर साळगावमध्ये तणाव निर्माण झाला. गोवा वीज विभागासाठी काम करणाऱ्या नोएडा येथील कंत्राटदाराशी संबंधित या कृतीमुळे रहिवाशांनी हस्तक्षेप करण्यापूर्वीच ६-८ ट्रक गाळे उतरवण्यात आले होते.

मुसळधार पावसामुळे फूटपाथ कोसळला

मुसळधार पावसामुळे स्कोडा शोरूमजवळील ताळीगाव येथे फूटपाथ कोसळला

२६ ऑक्टोबर २०२५ रोजी पणजीमध्ये ६९.२ मिमी पावसाची नोंद

२६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८:३० ते रात्री ८.३० दरम्यान पणजीमध्ये ६९.२ मिमी पावसाची नोंद झाली, तर मोपा विमानतळावर ३५.५ मिमी पावसाची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem: जुन्‍या पुलावर टँकर अडकताच नव्‍या पुलाचे 'धाडसी उद्‌घाटन', वाहतूक कोंडीमुळे चालकांचा सुटला संयम; सांगेतील प्रकार

Canacona: युवा पिढीसाठी गोकर्ण पर्तगाळी मठात ॲम्‍फी थिएटर, युवकांना करणार आकर्षित; 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व कामांची पूर्तता

Baina Vasco Robbery Case: बायणा प्रकरणात दरोडेखोरांना फ्लॅटची इत्थंभूत माहिती कशी? मागच्या वाटेने, लिफ्टने, थेट नायक यांच्‍याच बेडरूमपर्यंत गेलेच कसे?

Zuarinagar: झुआरीनगरात उसळला आगडोंब, भंगारअड्डे भस्मसात; 'अग्निशमन'चे शर्थीचे प्रयत्न, हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक

Goa Taxi: यापुढे 'लिव्‍ह अँड लायसन्‍स'वर नोंदणी नाही! व्यावसायिक वाहनांवर CM प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण; लवकरच परिपत्रक जारी होणार

SCROLL FOR NEXT