Exam Dainik Gomantak
गोवा

Goa News: अखेर गोवा बोर्डाने 'तो' निर्णय घेतला मागे! वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking 13 January 2025: गोव्यातील राजकारण, गुन्हे,क्रीडा, मनोरंजन आणि महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

अखेर गोवा बोर्डाने 'तो' निर्णय घेतला मागे!

दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिकेच्या फेरतपासणीसाठी प्रत्येक प्रश्नामागे 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय अखेर मागे‌. आता पूर्वीप्रमाणे पूर्ण उत्तर पत्रिकेच्या फेरतपासणी मागे 700 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

जीवन संपवण्याची धमकी देणारा हवालदार पर्वरी पोलिसांच्या ताब्यात; वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले

आत्महत्येची धमकी देणाऱ्या हवालदार तुकाराम शिरोडकर याला पर्वरी पोलिसांनी ताब्यात घेतले. अटल सेतूवरुन आत्महत्या करणार असल्याचे सांगत त्याने व्हिडिओ जारी केला होता. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्वरी पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. म्हापसा एसडीपीओकडून रिपोर्ट मागवण्यात आला आहे.

धारबांदोड्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; पोलिस तपास सुरु

धारबांदोडा तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवले. रात्री वडील रागावल्याने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज. पोलीस तपास सुरु.

प्रदेश भाजप अध्यक्ष म्हणून नव्या चेहऱ्याला संधी मिळायला हवी; तानावडे स्पष्टच बोलले

प्रदेश भाजप अध्यक्ष म्हणून नव्या चेहऱ्याला संधी मिळायला हवी. प्रत्येक सच्च्या भाजप कार्यकर्त्यामध्ये अध्यक्षपद संभाळण्याची क्षमता असल्याचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी म्हटले.

युवकांना राजकारणासह सर्वच क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी; CM सावंत यांचं प्रतिपादन

युवकांना राजकारणासह सर्वच क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी आहे. यासाठी नेतृत्व कौशल्य असणे आवश्यक आहे. स्वत:ला विकसित करुन उपलब्ध संधींचा तरुणांनी लाभ घ्यावा. पुढील दहा वर्षात या संधी मिळणार नाहीत, असे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

कामाला सुरुवात करा, सरकार मदत करेल

गोव्यातील एनजीओ आणि इतर विविध क्षेत्रात राज्याबाहेरची लोकं काम करत असल्याचे मला दिसते, ज्याचा आपण विचारही करत नाही. गोव्यातील लोकांनी काम हाती घ्यावं सरकार मदत करेल: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सावर्डे येथे 44 वर्षीय इसमाने घेतली नदीत उडी

कुडचडे येथील एका व्यक्तीने मीराभाग पुलावरून नदीत उडी मारल्याचा संशय आहे. घटनास्थळी पोलीस दाखल. पोलीस तपास चालू.

दत्ता नाईक यांना जामीन मंजूर!

न्यायालयाने साहित्यिक दत्ता दामोदर नायक यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आणि आता त्यांना २५ हजार रुपयांचा जमीन दंड भरावा लागेल.

बहुआयामी पियुष मिश्रा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

पियुष मिश्रा एक भारतीय चित्रपट अभिनेता, संगीत दिग्दर्शक, गीतकार, गायक, पटकथाकार आणि संवाद लेखक आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक तसेच हिंदी नाटककार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

Viral Video:...म्हणून शेन वॉर्न ग्रेट आहे... चार चेंडू आणि चार वेरिएशन्स; पाहा फिरकीच्या जादुगाराचा खास व्हिडिओ

SCROLL FOR NEXT