Sirsaim Waterfall Dainik Gomantak
गोवा

Sirsaim Waterfall: शिरसई धबधब्याच्या बफर झोनमधल्या MRF शेडचे बांधकाम थांबवा; ग्रामस्थांचा एल्गार

पर्यावरण रक्षणासाठी रहिवासी एकवटले

Ganeshprasad Gogate

स्नेहा हसोटीकर

सध्या म्हापसानजीकच्या शिरसई गावामध्ये मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF) शेडचे बांधकाम सुरु करण्यात आले असून ग्रामस्थांनी निषेध रॅली काढत बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला. कोनेशी धबधबा आणि लगतच्या जैव विविधतेचे रक्षण करणे आमची जबाबदारी असून पर्यावरण नष्ट करून आम्हाला विकास नको असा एल्गार यावेळी उपस्थित लोकांनी केला.

कोनेशी धबधबा (ज्याला शिरसई धबधबा म्हणूनही ओळखले जाते) गावाच्या दृष्टीने खूप महत्वाचा असून येथील लगतच्या पंचक्रोशीसाठी हा एका महत्वाचा जलस्रोत आहे. या नैसर्गिक संसाधनाचे पर्यावरणीय महत्त्व ओळखून सध्या सुरु असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी ग्रामस्थांनी आज निषेध रॅली काढली.

कोनेशी धबधब्याच्या स्त्रोताच्या बफर झोनमध्ये सुरु असलेले एमआरएफ शेडच्या प्रस्तावित बांधकामामुळे लगतच्या धबधब्याचे कायमचे नुकसान होणार.

त्याचबरोबर या प्रोजेक्टमुळे जवळपासच्या विहिरींचे सुद्धा प्रदूषण होणार असून याचा दूरगामी परिणाम गावाच्या भवितव्यावर होणार असल्याची भीती यावेळी नागरिकांनी बोलून दाखवली.

प्रोजेक्टमुळे गावावर गंभीर परिणाम ओढवणार असून ग्राम जैवविविधता समितीने अस्नोडा ग्रामपंचायतीद्वारे सुरु असलेले एमआरएफ शेडचे बांधकाम थांबवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

SCROLL FOR NEXT