Narkasur In Goa: नरकासुर प्रथा बंद करा; वीज मंत्री ढवळीकरांचे आवाहन

गोव्यात कॉंग्रेसच्या काळात 1980 मध्ये नरकासूर ही प्रथा सुरु करण्यात आली
Goa Power Minister Sudin Dhavalikar On Goa Narkasur 2023
Goa Power Minister Sudin Dhavalikar On Goa Narkasur 2023Dainik Gomantak

Goa Power Minister Sudin Dhavalikar On Goa Narkasur 2023: नरकासूर ही प्रथा गोव्यात कॉंग्रेसच्या काळात 1980 मध्ये सुरु करण्यात आली. नरकासूर ही प्रथा देशात कोठेही आढळत नसून ती गोव्यात आढळते.

नरकासुराच्या या प्रथेमुळे काही जणांना जीवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे ही प्रथा गोव्यात बंद करण्याचे आवाहन वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांनी वास्को येथे एका कार्यक्रमात केले. यावेळी वास्कोचे आमदार दाजी साळकर उपस्थित होते.

Goa Power Minister Sudin Dhavalikar On Goa Narkasur 2023
नखरेल अदांनी आणि चेहऱ्यावरील मोहक हावभावांनी इंस्टावर सामाजिक संदेश देणारी कुकू शिरोडकर

मंत्री ढवळीकर म्हणाले, "नरकासुर ही प्रथा गोव्यात कॉंग्रेसच्या काळात आणली गेली. नरकासुर स्पर्धा तसेच नरकासुर तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. आमच्या काळातही नरकासुर बनवला जात असे मात्र तो त्याच दिवशी 12 ते 4 वाजण्याच्या दरम्यानच."

"नरकासुरामुळे काही जणांना जीवही गमवावे लागले आहेत. आपण वाईट गोष्टींपासुन दूर व्हायला पाहिजे. नरकासूर ही प्रथा देशात कोठेही आढळत नसून ती गोव्यातच आढळते. मी माझ्या मतदारसंघात नरकासुर प्रथा बंद केली आहे. गोव्यातही नरकासूर प्रथा बंद करावी असे आवाहन मंत्री ढवळीकर यांनी केले."

नरकासुराचा जयघोष करण्यापूर्वी आपण श्रीकृष्णाचे कर्तव्य समाजापुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायला हवा. नरकासूर नको, तर आम्हाला मॉं दुर्गेचे स्वरुप पाहिजे. आम्हाला राजकारणातील नरकासुरांना दूर करायचे आहे असा मिश्किल टोला वीजमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com