Sadananda Shet Tanawade Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police: मंत्री फळदेसाई यांनी ‘तेथे’ जाणे चूकच!- सदानंद शेट तानावडे

करासवाडा येथील मूर्तीभंजन प्रकारावर प्रतिक्रिया

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Police करासवाडा-म्हापसा येथे मूर्तीभंजन झाल्यानंतर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी तेथे भेट दिली होती. ती त्यांची कृती चूकच होती, अशी ठाम भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केली. भाजपच्या येथील कार्यालयात पत्रकार परिषदेवेळी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी ही भूमिका मांडली.

राज्यात मूर्तीभंजनाचे प्रकार घडत आहेत. धार्मिक सलोखा अबाधित राखण्यासाठी सरकार पावले टाकत आहे, वेळोवेळी आवाहनही करत आहे. अशावेळी फळदेसाई घटनास्थळी जातात आणि कडक कारवाईची मागणी करतात, इशारा देतात, याविषयी पक्षाची भूमिका काय, असे तानावडे यांना विचारण्यात आले.

त्यावर तानावडे म्हणाले, अशा घटना घडल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यावर सरकारने भर दिला होता. धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत.

राज्यसभेचा सदस्य म्हणून केंद्रातून विविध योजनांचा निधी राज्यासाठी आणण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

यावेळी त्यांच्‍यासोबत भाजपच्या प्रदेश माहिती तंत्रज्ञान विभागाचे संयोजक तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

SCROLL FOR NEXT