Mapusa Crime Case Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime Case: प्रभू श्रीरामांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; हिंदू संघटना आक्रमक

Mapusa Crime Case: संबंधीत व्यक्तीला अटक करण्याची संघटनांची मागणी

Ganeshprasad Gogate

Mapusa Crime Case: काल 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. लाखो राम भक्तांसाठी हा जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा हा क्षण असून काल दिवसभर देशात आणि सर्व राज्यात ठिकठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान या उत्साहाच्या दिवशी गोव्यातील एका कार्यक्रमावेळी सोशल मीडियावरच्या एका पोस्टवर प्रभू श्री रामाविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याची घटना गोव्यात घडली आहे.

या घटनेनंतर तीव्र शब्दात प्रतिक्रिया उमटल्या असून या संबंधीत व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करुन अटक करण्याची मागणी गोमंतक स्वराज्य संस्था आणि म्हापसा येथील युवकांनी केली आहे.

या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी आज म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण असोलकर, स्वराज्य गोमंतक संघटना तसेच इतर सर्व हिंदू संघटनांनी पोलिसांना घेराव घातल्यावर पोलिसांनी या घटनेची सविस्तर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

काही दिवसांपूर्वी पर्वरी येथे अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमाचा लावलेला बॅनर फाडल्याने तणाव निर्माण झाला होता.

त्या घटनेनंतर पोलिस कायदा-सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. बॅनर लावलेल्या परिसरातील cctv फुटेज तपासून त्यांनी बॅनर फडणाऱ्याला तब्यत घेत त्याच्यावर कारवाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT