Goa Crime Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: महत्वाची अपडेट! धिल्लन हत्येतील संशयितांना 10 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime Case: वाशी-मुंबई येथील टोलनाक्यावर नवी मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांच्या मदतीने कार अडवून त्यांना ताब्यात घेतले होते.

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: मार्रा-पिळर्ण येथील निम्स धिल्लन यांच्या हत्येतील संशयित जितेंद्र साहू (32, भोपाळ) आणि नीतू राहुजा (22, भोपाळ) यांना म्हापसा न्यायालयाने 10 पोलिस कोठडी सुनावली. पर्वरी पोलिसांनी या संशयितांना मुंबईतून आज सोमवारी (ता.5) दुपारी गोव्यात आणले.

या प्रकरणाचा पूर्व इतिहास असा की, मार्रा-पिळर्ण येथील हॉरिझन्स आझुरा प्रकल्पातील व्हिलांचे मालक निम्स धिल्लन (77, रा. कांदोळी, मूळ पंजाब) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता.

याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी एक पुरुष आणि एका महिलेस वाशी-मुंबई येथील टोलनाक्यावर नवी मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांच्या मदतीने त्यांची कार अडवून ताब्यात घेतले होते.

ताब्यात घेतलेल्या त्या पुरुष व महिला संशयिताने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान संशयित जितेंद्र साहू आणि नीतू राहुजा यांना आज सोमवारी (ता.5) दुपारी गोव्यात आणल्यावर न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रविवारी (४ फेब्रुवारी ) सकाळी धिल्लन हे निपचित अवस्थेत बेडवर पडलेल्या स्थितीत आढळले. धिल्लन यांच्या मॅनेजर सीमा सिंग यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी पोलिसांना संशयिताच्या शरीरावर काही जखमा तसेच त्यांच्या अंगावरील काही सुवर्णलंकार (सोनसाखळी, हातातील कडा) तसेच मोबाईल फोन गायब असल्याचे लक्षात आले होते.

शनिवारी (ता.3) रात्री या व्हिलामध्ये धिल्लन यांना भेटण्यासाठी त्यांचे काही पाहुणे आले होते. याठिकाणी पार्टी सुरू होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी धिल्लन हे मृतावस्थेत बेडवर आढळले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, पर्वरीचे पोलिस निरीक्षक राहुल परब, उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाची मदत घेतली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 392 नुसार गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT