Marra-Pilerne Death Case: ढिल्लों यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी दिली गुन्ह्याची कबुली!

जितेंद्र साहू आणि नीतू रहुजा अशी संशयितांची नावे आहेत.
Marra-Pilerne Death Case
Marra-Pilerne Death CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Marra-Pilerne Death Case

मार्रा-पिळर्ण येथील होरिझन्स आझुरा प्रकल्पमधील काही व्हिलांचे मालक असलेले निम्स ढिल्लों (77, रा. कांदोळी, मूळ-पंजाब) यांचा काल (रविवार) संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून दोन संशयितांना हेरले.

उपलब्ध माहितीनुसार, याप्रकरणी वाशी-मुंबई टोलनाक्यावर नवी मुंबई क्राईम ब्रॅंच पोलिसांनी दोघा संशयितांना चारचाकी गाडीसह घेतले ताब्यात आहे. जितेंद्र साहू आणि नीतू रहुजा अशी संशयितांची नावे आहेत.

महत्वाची बाब म्हणजे, ताब्यात घेतलेल्या कथित पुरुष व महिला संशयिताने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, निम्स ढिल्लों हे पंजाबच्या एका माजी मंत्र्यांचे नातेवाईक होते. या घटनेतील हत्येचे कारण अद्याप उलगडू शकले नाही. पोलीस पथक याबाबत अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Dinesh Gawade Death Case
Dinesh Gawde Death Case
Subhash Naik Death Case
Ishan Badgujar Culpable Homicide Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com