Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Dengue Case In Goa: डेंग्यूच्या नियंत्रणासाठी आरोग्ययंत्रणा अलर्टमोडवर; नगरसेवकांमध्ये केली जातेय जागृती

डासांच्या प्रादुर्भावाचा बंदोबस्त करणे हाच संक्रमण रोखण्याचा उपाय- डॉ. शॅरल डिसोझा

गोमन्तक डिजिटल टीम

Dengue Case In Goa डासांपासून होत असलेल्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका स्तरावर आवश्यक ती पावले आरोग्य केंद्राकडून उचलली जात आहेत. तरीही सध्या लोकांचे अपेक्षित सहकार्य मिळत नाही, अशी चिंता आरोग्य अधिकारी तसेच नगरसेवकांनी व्यक्त केली.

अशावेळी डासांच्या प्रादुर्भावाचा बंदोबस्त करणे हाच या आजारांचे संक्रमण रोखण्याचा एकमेव उपाय आहे, याकडे आरोग्याधिकारी डॉ. शॅरल डिसोझा यांनी लक्ष वेधले.

याच पार्श्वभूमीवर, सेप्टिक टाकी झाकण्याकरिता आरोग्य केंद्राकडून रहिवाशांना जाळ्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. परंतु, लोक त्याचा वापर करत नाहीत. त्यामुळे या जाळ्या सेप्टिक टाकीवर सक्तीने घातल्या जातील, याची खबरदारी यापुढे पालिका घेणार आहे.

त्यासाठी पालिका सर्व प्रभागांत कामगार उपलब्ध करून या जाळ्या संबंधितांच्या टाकीवर घालणार, असे आजच्या बैठकीत ठरले. यंदा जानेवारीपासून ते आतापर्यंत आरोग्य केंद्राच्या परिक्षेत्रात डेंग्यूचे २० रुग्ण आढळले, ज्यात जुलैमध्ये सात सक्रिय प्रकरणांचा समावेश होता.

म्हापसा नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डेंग्यू प्रतिबंधाविषयी आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.3) म्हापसा पालिकेच्या नगरसेवकांमध्ये जागृती केली.

आणि सर्व नगरसेवकांनी या डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करून लोकांमध्ये जागृती करण्यास मदत करावी, असे आवाहन आरोग्याधिकाऱ्यांनी उपस्थितांना केले.

म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही जागृती बैठक झाली. बैठकीस आरोग्याधिकारी डॉ. शॅरल डिसोझा यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपनगराध्यक्ष विराज फडके, नगरसेवक सुधीर कांदोळकर, प्रकाश भिवशेट, तारक आरोलकर, अ‍ॅड. शंशाक नार्वेकर, डॉ. नूतन बिचोलकर, सुशांत हरमलकर, किशोरी कोरगावकर, केयल ब्रागांझा, आशीर्वाद खोर्जुवेकर आदी उपस्थित होते. या नगरसेवकांनी महत्त्वाच्या सूचना व मते मांडली.

डेंग्यूबाबत प्रतिबंधात्मक उपाय...

  • डेंग्यूचा डास हा दिवसा चावतो. त्यामुळे पूर्ण बाह्यांचे व सर्व अंग झाकून घेणारे कपडे वापरावेत.

  • डेंग्यूपासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिवसा मच्छर अगरबत्ती व इलेक्ट्रॉनिक वेपोर मॅट वापरावे.

  • घरातील, परिसरातील सर्व पाणीसाठे रिकामे करावेत. साठवलेल्या पाण्याची भांडी कापड्याने झाकून ठेवावीत.

  • निरुपयोगी टायरचे संकलन करून नायनाट करावा. गटारे वाहती करावीत. तसेच घरांच्या दारे, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Final Host Nation: भारताला पुन्हा डावललं, पुढील 3 'WTC Final'चं यजमानपद 'या' देशाकडे; ICC ची मोठी घोषणा

India Justice Report: देशात न्याय वितरणात गोव्याची स्थिती बिकट, CM सावंत यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; इंडिया जस्टिस रिपोर्टमधून खुलासा

Indonesia Ship Fire: इंडोनेशियात जहाजाला भीषण आग, प्रवाशांनी समुद्रात घेतल्या उड्या; थरारक VIDEO व्हायरल!

Virat Kohli 5 Morning Habits: तुम्हीही व्हा विराटसारखे 'सुपरफिट'! कोहलीच्या फिटनेसचे रहस्य उघड, त्याची सकाळची 'ही' खास सवय माहितीय का?

Health Tips: वारंवार जुलाब लागणं असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण! इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

SCROLL FOR NEXT