Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Goa Municipality: म्हापसा पालिकेतर्फे निविदा जाहीर; 13 शौचालयांची होणार दुरुस्ती

Goa Municipality: मुख्याधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर म्हापसा पालिकेने तातडीत शौचालयांची दुरुस्ती करण्यासाठी निविदा काढली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Municipality: म्हापसा येथील कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालय सुविधा सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने म्हापसा पालिकेने शहरातील 13 सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढल्या आहेत. मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी नगरसेवकांसह म्हापशातील सर्व सार्वजनिक शौचालयांची अलीकडच संयुक्त पाहणी केल्यानंतर सदर दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला.

या पाहणीनंतर आता म्हापसा पालिकेने 13 शौचालयांची तातडीची दुरुस्ती करण्यासाठी निविदा काढली आहे. कारण या शौचालयांची स्थिती अत्यंत खराब असून त्यांना दुरुस्तीची गरज आहे. ज्यात मार्केट भागातील शौचालयांची देखील समावेश आहे.

प्रभाग 5 मध्ये शौचालयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून यामध्ये दोन शौचालये दुरुस्ती केल्या जातील. तर प्रभाग 19 मधील चार शौचालयांचा समावेश असून यात मार्केटमधील मडकी बाजारजवळील टॉयलेट ब्लॉकचा सहभाग आहे. तसेच प्रभाग 9,20, 4, 14, 7, 10 व 13 मधील प्रत्येकी एका शौचालयाचा समावेश आहे.

दरम्यान, सप्टेंबर 2022 मध्ये मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांच्यासह उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, बाजार समितीचे चेअरमन विराज फडके यांनी शहरातील प्रत्येक शौचालयांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली होती. यावेळी पालिका अभियंते व संबंधित प्रभागांची पर्यवेक्षकही उपस्थित होते. तपासणीदरम्यान स्वच्छता व इतर समस्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली.

अमितेश शिरवईकर, म्हापसा मुख्याधिकारी-

आम्ही 13 शौचालये शोधून काढली आहेत, ज्यांची तातडीने दुरुस्तीची गरज आहे आणि लवकरच काम हाती घेण्यात येईल. यासाठी पालिकेने निविदा काढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT