Goa News: म्हापसा येथील पालिकेचे तीन नगरसेवक हे आपल्याकडून हप्ता मागतात, असा दावा करीत म्हापसा मार्केट सोपो कंत्राटदाराने पालिकेत निवेदन दिले. मुळात हे आरोप गंभीर स्वरूपाचे असून या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी झाली पाहिजे.
दरम्यान, त्यामुळे ही तक्रार मुख्याधिकाऱ्यांनी पुढे म्हापसा पोलिसांकडे पाठवावी, अशा आशयाची मागणी करीत विरोधी गटातील नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. नगरसेवक सुधीर कांदोळकर, अॅड. शंशाक नार्वेकर, कमल डिसोझा, आनंद भाईडकर यांच्या मार्फत हे निवेदन मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांची भेट घेत मंगळवारी त्यांना सादर करण्यात आले. तीन नगरसेवकांनी आपल्याकडून प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपयांची लाच मागितली, असा दावा करीत म्हापसा मार्केट सोपो कंत्राटदाराने आपले निवेदन पालिकेत दिले आहे.
पोलिसांकडे थेट जावे
शिरवईकर म्हणाले, मुळात मार्केट सोपो कंत्राटदार हा जास्त शुल्क आकारतोय, अशी लेखी तक्रार मध्यंतरी दोन नगरसेवकांनी माझ्याकडे केली होती. त्यानुसार, मी चौकशी केली असता, यात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे आढळले.
याविषयी सुनावणी सुरू असल्याचे ते म्हणाले. आणि कोणी लाच मागत असल्यास त्या कंत्राटदाराने मुळात पोलिस किंवा संबंधित चौकशी यंत्रणेकडे थेट जाण्याची गरज आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
सोपो कंत्राटदारास कारणे दाखवा नोटीस
सोपो कंत्राटदार हा म्हापसा मार्केटमधून जास्त शुल्क आकारतोय, अशा तक्रारी येत असल्याने म्हापसा पालिका मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित सोपो कंत्राटदारास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसाला उत्तर देणारे कंत्राटदाराचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सुधीर कांदोळकर, नगरसेवक-
मुळात या प्रकारामुळे लोक आम्हांला संशयाच्या नजरेने बघताहेत. लोक फोन करून प्रश्न विचारताहेत. मुळात आम्ही अशा कुठल्याही भानगडीत नाही. त्यामुळे सोपो कंत्राटदाराची ही तक्रार मुख्याधिकाऱ्यांनी पुढे पोलिसांकडे पाठवावी व याचा सोक्षमोक्ष लावावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.