Mapusa KTC Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Mapusa KTC Bus Stand: तुटलेले पत्रे, पसरलेला कचरा, साचलेले पाणी... केटीसी बस स्थानक समस्यांच्या गर्तेत

कचराकुंड्यांचा अभाव ः लोकार्पणानंतर देखभालीकडे दुर्लक्ष; परिसरात दुर्गंधी

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa KTC Bus Stand छताचे तुटलेले पत्रे, आजूबाजूला पसरलेला कचरा, पावसाळ्यामुळे ठिकठिकाणी आवारात साचलेले पाणी हे पाहून म्हापशातील नवीन केटीसी बस स्थानक सध्या बिकट अवस्थेत दिसत आहे.

स्थानकावर कचरा कुंड्यांचा अभाव असल्याने प्रवाशीवर्ग मिळेल तिथे कचरा फेकतात, नंतर तो सफाई कामगारांना गोळा करून एका कोपऱ्यात ठेवला जातो. परंतु, वेळेत तो उचलला जात नसल्याने सध्या या कचऱ्याला दुर्गंधी येत असून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जानेवारी 2022 मध्ये या नवीन केटीसी अंतरिम बसस्थानकाचे लोकार्पण झालेले. तेव्हापासून या स्थानकाच्या देखरेखीकडे तितके लक्ष देण्यात आलेले दिसत नाही. प्रवाशांना थांबण्यासाठी असलेल्या फ्लॅटफॉर्मवर पत्र्यांची शेड उभारली आहे.

परंतु, पावसाळ्यात पावसाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. तर या शेडवरील काही पत्रे काही दिवसांपूर्वीच उडून गेलेत. परंतु ते अद्याप बदलेले नाहीत. तसेच इतर काही पत्रेसुद्धा सैल झालेले दिसतात.

याशिवाय बसस्थानकाचे मुख्य फाटक (गेट) गेल्या वर्षभरापासून मोडकळीस आली आहे. परिणामी, रात्रीच्या वेळी तेथील सुरक्षारक्षक हे फाटक उचलून ती मधोमध ठेवतात. त्याचप्रमाणे, बसस्थानकावरील सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह आहेत.

कारण, काही प्रवासी किंवा इतर ठवाळखोर येथे सार्वजनिकस्थळी सिगरेट किंवा दारु पितात. त्यामुळे सुरक्षा रक्षक त्यांना हटकल्यास अनेकदा सुरक्षा रक्षक तसेच संबंधित व्यक्तीत खटके उडण्याचे प्रकार अधूनमधून घडताहेत.

दरम्यान, या बसस्थानकावर ४५ ते ५० वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे. परंतु, विकेंडच्या वेळी यास्थळी स्थानकावर ७० बसेस यांना समायोजित करुन घेतले जाते.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

या बसस्थानकावरील सूत्रांनी सांगितले की, शेडवरील उडालेले पत्रे तसेच कचराकुंड्यांचा विषय अनेकवेळा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहचविला. परंतु, अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. याशिवाय अतिरिक्त सुरक्षा रक्षकाची या स्थानकावर गरज आहे. सध्या केटीसीची देखरेखीची जबाबदारी ‘जीएसआयडीसी’वर आहे. तसेच स्थानकावरील काही पेव्हर्स उखडलेले आहेत. तर, वॉशरुमधील काही काचा गायब दिसतात.

म्हापसा नवीन बसस्थानकाचे काम हे निकृष्ट दर्जाचे केलेले दिसते. येथील शेडवरील पत्रे उडालेले असून ते अद्याप बदलले नाहीत. कचराकुंड्यांअभावी कचऱ्याचा ढीग सर्वत्र साचलेला दिसतो. येथील पेव्हर्स मोडून पडलेत तर स्थानकाच्या आवारात पाणी साचत आहे. मुळात हे बसस्थानक नसून फक्त नावापुरती बसथांबाच आहे. - अ‍ॅड. शशांक नार्वेकर, म्हापसा नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT