Calangute Theft Case Dainik Gomantak
गोवा

Calangute Theft Case: कळंगुट मधील 'त्या' चोरीचा पर्दाफाश; पर्यटकांचा चोरीला गेलेला लाखोंचा ऐवज हस्तगत

Calangute Theft Case: कळंगुट पोलिसांच्या सतर्कपणामुळे परप्रांतीय चोरटे जेरबंद

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute Theft Case: पर्यटकांनी गजबजलेल्या गोव्यात गुन्हेगारीच्या घटना घडत असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही घटनांना आळा घालण्यात यश येतंय. आज शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर) पालघर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या किमती वस्तूंवर डल्ला मारल्याची घटना कळंगुट भागात घडली. मात्र पोलिसांच्या सतर्कपणामुळे चोरट्याचा वेळीच शोध घेतला गेलाय.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पालघर येथील व्हेनेसा डिसोझा यांची लेदर बॅग चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी कळंगुट पोलीस स्थानकांत दिली होती. या बॅगमध्ये १ ऍपल आयपॅड, २ एचपी लॅपटॉप, घड्याळ, नॉईज एअरपॉड्स वन ऍपल एअरपॉड्स, वन प्लस मोबाईल फोन असे किमती साहित्य होते.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी सूत्रांच्या माहितीच्या आधारे अफचर अली अब्दुल जलील मिया (रा. गौरवाडा मूळ रहिवासी गंगारामपूर, जिल्हा-दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल) आणि मोछबेर अली रा. समसेर अली (रा. तुळशीदास आमदार कार्यालयाजवळ, परबवाडा कळंगुट; मूळ रा. जिल्हा-दक्षिण दिनाजपूर पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांच्याकडे वरील सर्व साहित्य आढळून आले. त्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कळंगुट पोलीस ठाण्यात त्यांच्यावर भादंवि 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT